Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे क्रिकेटपटूच नाही तर अभिनेतेही आहेत, ते आता काय करतात घ्या जाणून

Yograj Singh: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याचे वडील योगराज सिंग हे सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. एकेकाळी स्वतः क्रिकेटपटू असलेले योगराज सिंह हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहतात.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग कोण आहेत?

अलिकडेच, एका पॉडकास्टच्या मुलाखतीदरम्यान योगराज सिंह यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यामुळे आता बराच वाद निर्माण होत आहे. योगराज सिंह यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्यांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.

Yograj Singh

योगराज सिंग यांची अभिनय कारकीर्द

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे एक अभिनेते देखील आहेत. योगराज यांनी अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. योगराज सिंह यांनी हिंदी चित्रपटांसोबतच दक्षिणेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

-योगराज सिंग फरहान अख्तरच्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातही दिसले होते. या चित्रपटात योगराज सिंह यांनी प्रशिक्षक रणवीर सिंगची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं होतं.

-2024 मध्ये, योगराज सिंह प्रसिद्ध दक्षिण अभिनेते कमल हासन यांच्यासोबत 'इंडियन 2' चित्रपटात दिसले होते. एस शंकर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी खूप चांगला अभिनय केला आहे.

- योगराज सिंह यांनी अक्षय कुमारसोबत 'सिंह इज ब्लिंग' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात योगराज सिंगच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

योगराज सिंग क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देतात

हिंदी आणि दक्षिणेकडील चित्रपटांव्यतिरिक्त युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनीही अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'बिवी रजनी' चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं होतं. चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, योगराज सिंह अजूनही क्रिकेटचे प्रशिक्षण देतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+