Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'तुला कैतरीना बनवतो त्या बदल्यात मला काय देणार' ?,नोरा फतेहीने शेअर केले स्ट्रगलचे अनुभव

Nora Fatehi: बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने आपल्या जून्या आठवणींना उजाळा दिला आहे. मेलबर्नमधील IFFM कार्यक्रमादरम्यान तिने राजीव मसंद यांच्यासोबत कारकिर्दीचे सुरुवातीचे अनुभव शेअर केले आहेत. नोरा फतेहीने अनेक कठीण आव्हानांना तोंड देत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच नोरा फतेहीला तिचे संघर्षमय दिवस आठवले. कामाचे आश्वासन देऊन लोक कसा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते, हे नोराने सांगितलं आहे.

नोरा म्हणाली की दिवसांत तिला अनेक लोक भेटले होते जे कमकुवत शिकार शोधत होते. हे विचित्र लोक मला वचन द्यायचे की ते माझ्यासाठी मोठ्या प्रॉडक्शन हाऊसशी बोलतो. नोरा त्यावेळी इंडस्ट्रीत नवीन होती. त्यामुळे तीही या लोकांना फॉलो करायची. यादरम्यान नोराने सांगितले की, एका फिल्म मेकरने तर म्हटले होते की, मी तुला बॉलिवूडची पुढची कतरिना कैफ बनवीन, पण त्या बदल्यात मला काय मिळणार आहे. त्या सुरुवातीच्या दिवसांत नोरा कधीकधी कठीण परिस्थितीत अडकली होती.

Bollywood actress nora fatehi

मिडीया रिपोर्ट्सनुसार नोरा जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा ती फक्त 22 वर्षांची होती. कॅनडाहून मुंबईत बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी आली होती. तो काळ आठवून नोरा म्हणाली 'आता मला प्रश्न पडतो की मी त्यांच्या मागे का जात होते? फुकट कोणी काही करत नाही. पण तेव्हा मला वाटायचे की, या माणसाला देवाने पाठवलं आहे. मी अनेक मूर्ख लोकांना फॉलो केले होते. जरी त्यांनी योग्य व्यक्तीशी ओळख करून दिली तरी त्या बदल्यात त्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा असायची.

नोराने सांगितले की, यामुळे मी अनेकदा वाईट परिस्थितीत अडकले आहे. ज्याच्या शेवटी लोक मला विचारायचे, मला सांग, मला बदल्यात काय मिळेल? आणि मग मला त्याच्याशी लढावे लागले. ते खूप विचित्र होते. नोरा म्हणाली की, मला या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. कधी कोणा जवळ निराश बोलून दाखवायची नाही, कारण त्यामुळे शोषण होण्याची शक्यता वाढते.

हा काळ केवळ आव्हानात्मक नव्हता तर मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला होता. लोक मला अनेकदा विचारायचे की, तुला पुढची कतरिना कैफ बनायचं आहे का, पण मला त्या बदल्यात काय मिळेल. जणू ते एक अशक्य स्वप्नच आहे. मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती आणि त्यावेळी मला थेरपीही घ्यावी लागली असल्याचं नोराने सांगितलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+