शरद कपूरवर लैंगिक छळाचा आरोप, 32 वर्षीय महिलेने सांगितली कहाणी, जाणून घ्या खोलीत काय घडलं ?
Sharad Kapoor News: बॉलिवूड अभिनेता शरद कपूरबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. लैंगिक छळाच्या आरोपांमुळे शरद कपूर चर्चेत आला आहे. एका 32 वर्षीय महिलेने अभिनेता शरद कपूर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याचे वृत्त आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता शरद कपूरवर 32 वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने आरोप केला आहे की, अभिनेत्याने तिला आपल्या घरी बोलावले होते. यादरम्यान त्याने महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि बळजबरीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला असल्याचा म्हटलं आहे.

अभिनेता शरद कपूर विरोधात गुन्हा दाखल
'शरद कपूरने माझ्यासोबत गैरवर्तन केले' मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका 32 वर्षीय महिलेने अभिनेता शरद कपूरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. शरदने मला काही व्यावसायिक कामाच्या संदर्भात त्यांच्या घरी बोलावले होते. यानंतर तेथे माझ्याशी गैरवर्तन करून जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असल्याचं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मुंबईच्या खार पोलिसांनी अभिनेता शरद कपूरविरुद्ध बीएनएसच्या कलम 74, 75 आणि 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांला आरोपांबाबत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अभिनेता किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
A case has been registered against actor Sharad Kapoor for alleged misbehaviour with a 32-year-old woman. The victim alleged that the actor had called her to his house, during which he tried to misbehave with her, and also forcibly touched her inappropriately. Khar Police have…
— ANI (@ANI) November 30, 2024
सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली मैत्री
IANS च्या वृत्तानुसार, महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद कपूरशी मैत्री झाली. यानंतर दोघेही अनेकवेळा व्हिडिओ कॉलवर बोलले. शरदने त्या महिलेला सांगितले होते की, शूटिंगबाबत मला तिच्याशी बोलायचे आहे. यासाठी तिला खार येथील त्याच्या कार्यालयात बोलावण्यात आले, परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महिलेला ते शरदचे कार्यालय नसून त्याचे घर असल्याचे समजले.
पीडित महिलेचे अभिनेत्यावर गंभीर आरोप
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती अभिनेता शरद कपूरच्या घरी पोहोचली तेव्हा तिला तिसऱ्या मजल्यावर बोलावण्यात आले आणि एका व्यक्तीने दरवाजा उघडला. यानंतर शरदने आतून आवाज देत बेडरूममध्ये बोलावले. महिलेचे म्हणणे आहे की, अभिनेता शरदने तिला संध्याकाळी काही घाणेरडे मेसेजही पाठवले होते. पीडितेने या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला दिली होती आणि त्यानंतर खार पोलीस ठाण्यात अभिनेता शरद विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications