शाहरुख खाननंतर पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरु
मुंबई. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या यांच्या हत्येनतंर सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आज पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक वाहतूक पोलिसांच्या नंबरवर पुन्हा धमकीचा फोन आला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांची यांच्या टोळीकडून ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती आहे.
वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या एका महिन्यात सलमानला मारण्याचा हा चौथा कॉल आहे. काल ता. 7 नोव्हेंबरला शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता.

दरम्यान शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन छत्तीसगडच्या रायपूरमधून आला होता. छत्तीसगडच्या रायपूरमधून ही धमकी मिळाली आहे. फैजान नावाच्या व्यक्तीच्या नावाने असलेल्या नंबरवरून शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी ज्या व्यक्तीने सलमान खानला धमकी दिली होती त्या आरोपीचं नाव विक्रम असे आहे. 35 वर्षीय विक्रमला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. विक्रमने फोन करून 5 कोटी रुपये द्या किंवा बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन काळवीटाची शिकार केल्याबद्दल माफी मागा अशी धमकी दिली होती.












Click it and Unblock the Notifications