बॉलिवूड अभिनेत परेश रावल यांच्या पोस्टने राजकीय वर्तूळात खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Paresh Rawal: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्याच्या एका सोशल मिडीया पोस्टने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. परेश रावल यांनी त्याच्या एक्स हँडलवर राहुल गांधींचा असा फोटो शेअर केला आहे की, तो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि गाढवाचा फोटो व्हायरल
अभिनेते आणि राजकारणी परेश रावल यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खूप चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो आहे. या पोस्टबद्दल सोशल मिडीयावर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जफर नावाच्या व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि गाढवाचे चित्र बनवलं आहे. हे चित्र एआयच्या मदतीने तयार केले गेले आहे. म्हणजेच फोटो पूर्णपणे मॉर्फ केलेला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना जफरने लिहिले होते - या फोटोतून कोणी गाढव काढू शकेल का? आता परेश रावल यांनी तोच फोटो पुन्हा शेअर केला आहे आणि लिहिले आहे - तुम्हाला ही फ्रेम रिकामी करायची आहे का?
You mean empty the frame ? https://t.co/H41C98lGob
— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 12, 2025
परेश रावल यांच्या पोस्टवरुन वाद
परेश रावल यांच्या या पोस्टवर लोक प्रमाणात कमेंट करत आहेत. परेश रावल यांची ही पोस्ट लोकांना अजिबात आवडली नाही. अभिनेत्याच्या या चुकीच्या वागण्यावर अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. काही लोकांनी तर त्याच्या टोमण्याला क्रूर म्हटलं आहे. लोकांनी त्याला सोशल मीडियावर अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळण्याची सूचनाही केली आहे.
परेश रावल यांची राजकीय कारकीर्द
परेश रावल हे एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते एक राजकारणी ही आहेत. 2014 मध्ये अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे खासदार देखील होते. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्यास नकार दिला.दरम्यान ते आजही पक्षाचे समर्थक आहेत.
परेश रावल यांचे आगामी प्रोजेक्ट्स
परेश रावल यांनी शेवटचा चित्रपट 2024 मध्ये अक्षय कुमारसोबत 'सरफिरा' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'सूरराय पोत्रू' चित्रपटाचा रिमेक होता. परेश रावल लवकरच 'बदतमीज दिल', 'थामा', 'द ताज स्टोरी', 'भूत बांगला', 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.












Click it and Unblock the Notifications