Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

क्लर्क ते चित्रपटसृष्टीतील महानायक! चेहऱ्यावर हावभाव, टायमिंगचा बादशहा, वाचा- अशोक सराफ यांच्याविषयी

Ashok Saraf Biography : तब्बल चार दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणणारे मराठी सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. अशोक सराफ यांनी चित्रपट करिअरमध्ये जवळपास अडीचेशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अगदी विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिका त्यांनी पडद्यावर साकारल्या आहेत.

हिंदी-मराठी चित्रपट, मालिका आणि मराठी रंगभूमीवरील हिरा. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोक सराफ खासगी आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचे आहे. मीडियापासूनही ते कायम लांब राहतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नसते. संपूर्ण रसिक प्रेक्षकांनी त्यांना मामा ही उपाधीच दिली आणि मामा म्हणून घेणे अशोक सराफ यांना देखील विशेष आवडते. चला जाणून घ्या, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अशोक सराफ अर्थात अशोक मामांविषयी.

Ashok Saraf Biography

निवेदिता जोशी यांच्यासोबत केले लग्न

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.

Ashok Saraf Biography

विनोदाची अचूक वेळ हे त्यांचे वैशिष्ट्ये

त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहिले आहे.

सुरुवातीपासूनच रंगभूमीविषयी आकर्षण

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. दरम्यान अशोक सराफ हे बॅंकेत नोकरीला लागले पण त्यांचे मन काही तिथे लागले नाही. अन् त्यांनी पुन्हा सिनेसृष्टीकडे पाय वळवला.

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

Ashok Saraf Biography

ऐंशीच्या दशकात बेर्डे -सराफ जोडगोळीचे राज्य

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकें बरोबर पांडू हवालदार , तुमचं आमचं जमलं , राम राम गंगाराम यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' ही मराठी व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.

Ashok Saraf Biography

अशोक सराफ यांचे गाजलेले मराठी चित्रपट

आयत्या घरात घरोबा-गोपू काका, आमच्या सारखे आम्हीच भूपाल / निर्भय, आत्मविश्वास- विजय झेंडे, नवरी मिळे नवऱ्याला- बाळासाहेब, गंमत जंमत- फाल्गुन, भुताचा भाऊ बंडू, माझा पती करोडपती- दिनेश लुकतुके, अशी ही बनवाबनवी-धनंजय माने, बिनकामाचा नवरा- तुकाराम, फेका फेकी- राजन, एक डाव भुताचा- खंडोजी फर्जंद, आलटून पालटून- अभिनय, एक उनाड दिवस- विश्वास दाभोळकर, सगळीकडे बोंबाबोंब-सदा खरे, साडे माडे तीन- रतन दादा, कुंकू, बळीराजाचं राज्य येऊ दे, घनचक्कर, फुकट चंबू बाबुराव, तू सुखकर्ता, नवरा माझा नवसाचा, वजीर, एकापेक्षा एक, चंगु मंगु, अफलातून, शुभमंगल सावधान, गोडीगुलाबी, गडबड घोटाळा, गोष्ट धमाल नाम्याची, हेच माझं माहेर, गोंधळात गोंधळ, चोरावर मोर, जवळ ये लाजू नको, पांडू हवालदार, दोन्ही घरचा पाहुणा, राम राम गंगाराम, अरे संसार संसार, वाट पाहते पुनवेची, खरा वारसदार, कळत नकळत, आयडियाची कल्पना, झुंज तुझी माझी, टोपी वर टोपी, खलनायक.

Ashok Saraf Biography

या हिंदी चित्रपटात अशोकमामांनी केले काम

कुछ तुम कहो कुछ हम कहें गोविंद
बेटी नं. १ राम भटनागर
कोयला वेदजी
गुप्त हवालदार पांडू
ऐसी भी क्या जल्दी है डॉ. अविनाश
संगदिल सनम भालचंद्र
जोरू का गुलाम पी. के. गिरपडे
खूबसूरत महेश चौधरी
येस बॉस जॉनी
करण अर्जुन मुंशीजी
सिंघम हेड कॉन्स्टेबल सावलकर २०११
प्यार किया तो डरना क्या तडकालाल

Ashok Saraf Biography

अशोक मामांचे नावाजलेले नाटक

हमीदाबाईची कोठी
अनधिकृत
मनोमिलन
हे राम कार्डिओग्राम
डार्लिंग डार्लिंग
सारखं छातीत दुखतंय
व्हॅक्यूम क्लीनर

अशोक मामांनी काम केलेल्या मालिकांची नावं

मालिकेचे नाव
टन टना टन- ई टीव्ही मराठी- मराठी
हम पांच- आनंद माथुर- झी टीव्ही- हिंदी १९९५
डोन्ट वरी हो जाएगा- संजय भंडारी- सहारा टीव्ही- हिंदी २००२
छोटी बडी बातें- हिंदी
नाना ओ नाना- नाना- मी मराठी - मराठी २०११

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+