Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'बाहुबली' आणि 'आरआरआर' दिग्दर्शकावर गंभीर आरोप; मित्राने सुसाईड नोटमध्ये उघड केले रहस्य

बाहुबली, आरआरआर यासारख्या बीग बजेट चित्रपटाचे प्रसिद्ध दाक्षिणात्य निर्माते एस. एस. राजामौली यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. राजामौली यांच्या जवळच्या मित्राने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजामौली यांचे मित्र श्रीनिवास राव यांनी एक व्हिडिओ शेअर करत राजामौली यांनी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.

Rajamouli s Friend Allegations

व्हिडिओमध्ये केले आरोप

निर्माते राजामौली यांचा जवळचा मित्र श्रीनिवास यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रीनिवास राव दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ तेलुगू भाषेत केला आहे. व्हिडिओ शेअर करताना एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. व्हिडिओत ते म्हणत आहेत की, एस. एस. राजामौलींशी त्यांची ३४ वर्षांची मैत्री होती. पण प्रेम त्रिकोणामुळे त्यांची मैत्री ताणली गेली. राजामौली हे एका महिलेच्या प्रेमात होते. तो देखील त्याच महिलेच्या प्रेमात पडला होता. परंतु त्यांच्या मैत्रीसाठी त्याने स्वतःला रोखले. त्यांनी पुढे सांगितले की, यानंतरही राजामौली यांना त्यांच्याबद्दल संशय होता. त्याने सांगितले की जेव्हा राजामौरी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाले तेव्हा त्याने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली.

आता छळ सहन होत नाही

या व्हिडीओमध्ये श्रीनिवास यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की, आता मी ५५ वर्षांचा झालो आहे. आता मी त्यांचा छळ सहन करू शकत नाही. श्रीनिवासचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तो व्हायरल झाला. तथापि, राजामौली यांनी अद्याप या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर चित्रपट निर्माते कशी प्रतिक्रिया देतात, हे पहावे लागणार आहे.

एका महिलेसाठी आयुष्य उद्ध्वस्त

या व्हिडीओत श्रीनिवास म्हणतो की, तो त्याच्या मैत्रीसाठी मागे हटला पण दिग्दर्शक त्याच्या विरोधात गेला. आम्ही यमदोंगा पर्यंत एकत्र काम केले. पण तिने एका महिलेसाठी माझे करिअर उद्ध्वस्त केले. त्यांनी २००७ मध्ये बनवलेल्या एका चित्रपटाचा उल्लेख केला ज्यामध्ये दोघांनी एकत्र काम केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता ही महिला कोण, याचीही चर्चा होऊ लागली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+