Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बॉलिवूडची डान्सर क्वीन नोरा फतेह आहे करोडोच्या संपत्तीची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती

Nora Fatehi Net worth: बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नोरा फतेही आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आजकाल नोरा फतेहीच्या उत्कृष्ट डान्सचे सगळेच दिवाने आहेत. नोरा फतेहीच्या सौंदर्याचे ही लोक वेडे आहेत. नोरा फतेहीने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार आयटम सॉंन्ग केले आहेत.

Nora Fatehi Net worth

नोरा फतेहीचं बॉलिवूड करिअर

-नोरा फतेहीने तिच्या मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नोराला इंथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे.

-नोराचा जन्म 1992 मध्ये कॅनडामध्ये झाला आहे. एक उत्तम डान्सर असण्यासोबतच नोरा एक अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे. नोरा तिच्या उत्कृष्ट बेली डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा नोरा फतेही पहिल्यांदा कॅनडाहून भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5 हजार रुपये होते.

-आज नोरा फतेही कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकिन बनली आहे. ती खूप आलिशान जीवन जगते. ती तिच्या लूक आणि स्टाईलसाठी सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे.

-नोरा फतेहीने 2014 मध्ये 'रोर-टायगर ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नोरा फतेहीने अनेक तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

नोरा फतेहीची एकूण संपत्ती

- मीडिया रिपोर्ट्सनुसार आज नोरा फतेही 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची मालक आहे.

- नोरा फतेही तिच्या आयटम साँग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. एका गाण्याच्या डान्ससाठी सुमारे 2 ते 3 कोटी रुपये घेते.

- नोरा फतेही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी डान्सर बनली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+