Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'सिकंदरच्या' शेवटच्या गाण्यासाठी तुर्कीवरुन बोलवल्या 500 डान्सर, चित्रपटातील शेवटचं गाणं असणार खास

Salman khan: 'सिकंदर' हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या अ‍ॅक्शनने भरलेल्या टीझरने चित्रपटाच्या भव्य एंट्रीसाठी वातावरण निमिर्ती झाली आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सुपरस्टार सलमान खान, निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगादोसची त्रिकूट एकत्र येत आहे. पण आता चित्रपटाची भव्यता आणखी मोठ्या पातळीवर नेण्यात आली आहे. चित्रपटाच्या शेवटच्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी तुर्कीयेहून 500 डान्सरला बोलावण्यात आलं आहे, ज्यामुळे त्याची भव्यता आणखी वाढली आहे.

चित्रपटाशी संबंधित एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, "सिकंदरच्या शेवटच्या गाण्यासाठी तुर्कीहून 500 डान्सरला खास बोलावण्यात आले होते. त्यांच्या जबरदस्त अभिनय आणि परिपूर्णतेमुळे गाणे पाहण्यासारखे झालं आहे. हा सीक्वेन्स खास चित्रित करण्यात आला होता आणि त्यासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि समन्वय आवश्यक होता. हे डान्सर उच्च-ऊर्जेच्या कोरिओग्राफीमध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने गाण्याला एक वेगळीच झलक दिली आहे.

Sikandar

या सर्व गोष्टींवरून चित्रपटाची भव्यता स्पष्टपणे दिसून येते. साजिद नाडियाडवालाने नेहमीच आपल्या शानदार निर्मितीने बेंचमार्क स्थापित केले आहेत आणि सिकंदरही त्यापेक्षा वेगळा नाही. शानदार सेट्स, दमदार अॅक्शन आणि अद्भुत दृश्ये यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेला सिनेमॅटिक अनुभव बनवणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले पहिले गाणे "जोहरा जबीन" ने लोकांना आधीच तालावर नाचायला लावले आहे. त्याच वेळी चित्रपटाचे शेवटचे गाणे, जे विशेष काळजी घेऊन चित्रित केले गेले आहे, ते आणखी मोठा धमाका देणारे असणार आहे.

जशी-जशी सिकंदर चित्रपटासाठी वातावरण निर्मीती होत तशी लोकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. सलमान खान 2025 च्या ईदला मोठ्या पडद्यावर रश्मिका मंदान्नासोबत सिकंदरसह मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली बनलेला आणि ए.आर. दिग्दर्शित. मुरुगादोस दिग्दर्शित हा चित्रपट जबरदस्त अ‍ॅक्शन आणि भव्य दृश्यांसह एक स्फोटक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. खास गोष्ट अशी आहे की चित्रपटाशी संबंधित आणखी अनेक मोठे सरप्राइज येणे बाकी आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+