RRB Recruitment 2025: 'रेल्वे'त मेगा भरती! तब्बल 'एवढे' पदं! पात्रता 12 वी पास अर्ज कसा करायचा वाचा

RRB Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवांसाठी भारतीय रेल्वेने पुन्हा एक मोठी संधी उपलब्ध केली आहे! रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने या वर्षी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि ज्युनियर इंजिनियर (JE) या पदांसाठी एकूण ५६२० जागांची बंपर भरती जाहीर केली आहे.

बारावी पास उमेदवारांपासून ते इंजिनिअरिंग पदवीधरांपर्यंत, विविध पात्रतेच्या उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RRB Recruitment 2025

एकूण पदे: ५६२०

पदांचे प्रकार: एनटीपीसी (UG लेव्हल) आणि ज्युनियर इंजिनिअर (JE)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (rrbapply.gov.in)

१. NTPC UG लेव्हल भरती २०२५ (१२ वी पाससाठी)

  • १२ वी पास उमेदवारांसाठी ही भरती असून, यात एकूण ३०५० पदांवर नियुक्ती केली जाईल.
  • पदांचा तपशील: कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ट्रेन क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर कम टायपिस्ट यांसारख्या पदांचा समावेश आहे.
  • अर्ज करण्याची मुदत: २८ ऑक्टोबर २०२५ पासून २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.

पात्रता

  • उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.
  • सामान्य (General) प्रवर्गासाठी १२ वी मध्ये किमान ५०% गुण अनिवार्य आहेत. (SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना या टक्केवारीच्या अटीतून सूट.)
  • टायपिस्ट पदांसाठी उमेदवाराची इंग्रजीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये २५ शब्द प्रति मिनिट वेगाने टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे.
  • वयोमर्यादा (नियम बदल): रेल्वेने या वेळेस NTPC भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षांवरून घटवून ३० वर्षे केली आहे.
  • निवड प्रक्रिया: दोन टप्प्यांत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT) घेतली जाईल. टायपिंगच्या पदांसाठी कौशल्य चाचणी देखील घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू असेल.

२. RRB ज्युनियर इंजिनियर (JE) भरती २०२५ (इंजिनिअरिंग/डिप्लोमा धारकांसाठी)

  • ज्युनियर इंजिनियरच्या एकूण २५७० पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.
  • अर्ज करण्याची मुदत: ३१ ऑक्टोबर २०२५ पासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.

    पात्रता

  • उमेदवाराकडे सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय BCA, PGDCA किंवा DOEACC 'B' लेव्हल असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • वयोमर्यादा: १८ ते ३३ वर्षांदरम्यान (आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सूट).
  • निवड प्रक्रिया: दोन टप्प्यांत CBT परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) यांचा समावेश असेल. (पहिला CBT १०० प्रश्न, दुसरा CBT १५० प्रश्न).

अर्ज कसा कराल?

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत भरती पोर्टलवर (Official Website) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
  • अधिकृत संकेतस्थळ: rrbapply.gov.in
  • उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा आणि वेळेत आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+