Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NMDC Recruitment 2025 : 'एनएमडीसी'मध्ये 995 पदांसाठी भरती! एवढ्या पगाराच्या नोकरीची संधी, जाणून घ्या

NMDC Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (एनएमडीसी) 995 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे.

एनएमडीसीमध्ये नोकरीसाठी बी.एससी, डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. यासोबतच, अधिकाधिक तरुणांना या संधीचा फायदा घेता यावा म्हणून वयोमर्यादा आणि शुल्कातही विशेष सूट देण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

NMDC Recruitment 2025

संधी असली तरीही काही महत्वाच्या गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज प्रक्रिया कशी करावी, अर्जाची शेवटची तारीख आणि आवश्यक पात्रता निकष तसेच पगार यासारख्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आपण या पदांसाठीची माहिती जाणून घेऊया.

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती हवी? अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी उमेदवाराकडे किमान बी.एससी पदवी, डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करताना पासपोर्ट आकाराचा फोटो, दहावीची गुणपत्रिका, पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. सर्व आवश्यक माहिती आणि अर्ज फॉर्म एनएमडीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NMDC च्या अधिकृत वेबसाइट nmdc.co.in ला भेट द्यावी लागेल.
येथून ते ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

वयोमर्यादेत कुणाला सूट?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल.

कशी आहे परीक्षा आणि निवड प्रक्रिया?

एनएमडीसी विभागातील या पदांसाठी आवश्यक चाचणी ही संगणक आधारित (CBT) घेतली जाईल. यानंतर शारीरिक क्षमता चाचणी किंवा इतर चाचणी देखील असेल.

अर्जासाठी शुल्क किती?

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 150 रुपये भरावे लागतील. तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक आणि विभागीय उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

किती आहे पगार?

पगार आणि भत्ते निवडलेल्या उमेदवारांना पहिल्या 6 महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून मासिक 18,500 ते 19,500 रुपये वेतन मिळेल. यानंतर पगार दरमहा 31,850 ते 35,040 रुपये होईल.

हेही वाचा : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 970 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

हेही वाचा : SBI मध्ये बंपर नोकऱ्यांची संधी! 21 हजार पदांसाठी भरती होणार, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+