SBI मध्ये बंपर नोकऱ्यांची संधी! 21 हजार पदांसाठी भरती होणार, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती
Career News Bumper job opportunities in SBI : जर तुम्ही स्पर्धा परिक्षेची तयारी करत असाल, बँकींगची तयारी करत असाल किंवा नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत बंपर भरती सुरु होणार आहे.
भारतीय स्टेट बँक मोठ्या प्रमाणात पदभरतीची तयारी करत आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये जवळपास 18 हजार जणांना नियुक्त करण्याच्या हालचाली बँकेच्या आहेत.

ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे आणि तांत्रिक गोष्टीत सुसुत्रता आणण्यासाठी बँक त्यांचे मनुष्यबळ वाढवत आहे. अशातच इकाॅनाॅमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जवळपास साडे तेरा हजार ते चौदा हजार लिपिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे तर तीन हजार पदं प्रोबेशनरी आणि स्थानिक अधिकाऱ्यांची राहतील.
भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी स्पष्ट केले की, बँकेची भरती प्रक्रीया तांत्रिक परिवर्तनासाठी महत्वपूर्ण आहे. यासंदर्भात गुड रिटर्नसने वृ्त्त दिले आहे, त्यानुसार शेट्टी यांचे म्हणणे आहे की, जवळपास एकूण भरती 18 हजार जणांची केली जाईल. तंत्रज्ञानाच्या खर्चावर कोणतेही बंधन न घालता डिजिटल क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्यास बँक वचनबद्ध आहे.
1600 सिस्टीम अधिकाऱ्यांची भरती
तंत्रज्ञान आणि प्रणाली अधिकाऱ्यांची भरती लिपिक आणि अधिकारी पदांव्यतिरिक्त, एसबीआय त्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1600 सिस्टीम अधिकाऱ्यांची भरती करण्याची योजना एसबीआय आखत आहे.
तंत्रज्ञान गुंतवणुकीशी संबंधित विशिष्ट आकडेवारी जाहीर न करताही एसबीआयने डिजिटल प्रगतीला सातत्याने प्राधान्य दिल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञान-चालित मार्गाच्या आपल्या उद्दिष्टाचा पाठलाग करण्यात आपला तंत्रज्ञान खर्च अडथळा ठरू नये याची खात्री करण्याची बँकेची वचनबद्धता असल्याचेही ते म्हणाले.
अभ्यास कसा करावा..
- जर तुम्ही बँकेची परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत.
- तुम्ही आधी परिक्षेचा अभ्यासक्रम जाणून घ्या.
- या परिक्षेच्या नोट्स कुठे आणि कशा मिळतील यावर भर द्या.
- परिक्षेसाठी नोट्सचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट वेळ निवडा.
- योग्य अभ्यास करा, माॅक टेस्टद्वारे प्रश्नपत्रिका सोडवून पाहा. हा सराव खूपच महत्वाचा आहे.
- बँकींग क्षेत्रातील जागरुकता आणि आर्थिक घडामोडी तसेच चालू घडामोडी याचा अभ्यास करा.
- अर्थसंकल्प आणि त्यासंबंधीचे निर्णय याचाही तुम्ही अभ्यास करा यामुळे तुम्हाला चालू घडामोडीसंबंधित प्रश्न सोडवण्यासाठी फायदा होईल.
- प्रश्न सोडवण्याची आणि संकल्पना स्पष्ट करण्याची पद्धत विकसित करा.
- मुलाखतीची तयारी करण्यासाठी व्हिडिओ स्वरुपात अनेक मुलाखती युट्यूबवर आहेत त्या तुम्ही पाहू शकता.












Click it and Unblock the Notifications