Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET PG 2025: नीट पीजी परीक्षेचे नवीन वेळापत्रक काय आहे? 15 जून रोजी का होणार नाही एक्झाम,जाणून घ्या

NEET PG 2025 : NEET PG 2025 परिक्षा देण्याची तयारी करणाऱ्या लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठी अपडेट दिली आहे. पूर्वी ही परीक्षा 15 जून 2025 रोजी होणार होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (NBE) 3 ऑगस्ट 2025 पर्यंतचा वेळ दिला आहे.

30 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने NEET PG परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी, NBE ने ती दोन शिफ्टमध्ये घेण्याची योजना आखली होती, परंतु काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल करून आक्षेप घेतला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आपला निर्णय जाहीर केला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेत दोन शिफ्टच्या परीक्षा न घेता ती एकाचवेळी घ्यावी अशीम मागणी केली होती. यासह दोन शिफ्टमध्ये परिक्षा घेतल्यास या परिक्षांची काठिण्य पातळी वेगवेगळी असू शकते, ज्यामुळे विद्यार्थ्यांसोबत असमानता निर्माण होईल, असा युक्तिवाद करण्यात आला.

NEET PG 2025 What is the new schedule of NEET PG exam

युनायटेड डॉक्टर्स फ्रंट नावाच्या संघटनेने हा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय सारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये समानता आवश्यक असल्याचे मान्य केले. त्यानंतर एनबीईला सर्वोच्च न्यायालयाने एकाच शिफ्टमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भात सुचित केले आहे.

एनबीईची भुमिका काय?

एनबीईने न्यायालयाकडून आणखी काही वेळ मागितला आहे, कारण त्यांना एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी नवीन व्यवस्था,परिक्षा केंद्र या सर्व गोष्टींवर काम करावे लागणार आहे. न्यायालयाने ही मागणी मान्य मान्य केली आणि ३ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. परंतु त्याचवेळी हे स्पष्ट केले की,यानंतर दुसरी कोणतीही अंतिम मुदत दिली जाणार नाही. म्हणजेच आता तयारी करणाऱ्या उमेदवारांना 3 ऑगस्ट रोजी परीक्षेसाठी तत्पर राहावे लागू शकते.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ

याचिका दाखल होण्यापासून परिक्षेची तारीख लांबणीवर जाणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. कारण विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी अधिक तयारी करण्यास वेळ मिळाला आहे. आता परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल, ज्यामुळे सर्वांना समान संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक प्रणालीच्या दिशेने हे एक चांगले पाऊल मानले जात आहे.

वेळोवेळी तपासा वेबसाईट

वैद्यकीय शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या या परीक्षेची सुधारित तारखेबाबत एनबीईएमएसकडून अधिकृत अपडेट्स कधी येतील याची असंख्य विद्यार्थी वाट पाहत आहेत. या विद्यार्थ्यांनी वेळेवर सूचनांसाठी नियमितपणे अधिकृत वेबसाइट - natboard.edu.in - तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कुणी केली होती याचिका?

सात उमेदवारांनी एक याचिका दाखल केली होती. त्यात सर्व पदव्युत्तर वैद्यकीय इच्छुकांसाठी निष्पक्षता आणि एकरूपता राखण्यासाठी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएसला त्यांच्या परीक्षा योजनेची पुनर्रचना करण्याचे आणि पारदर्शक आणि समान मूल्यांकन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सुरक्षित, पुरेशी तयार केंद्रांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता परीक्षाही पुढे ढकलली असून एनबीईएमएस तयारी करत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+