MH CET 2025 चा निकाल 16 जून रोजी लागणार! cetcell.mahacet.org वर कसा पाहायचा निकाल? जाणून घ्या सर्व
MHT CET Result 2025 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) सेलने MHT CET 2025 च्या तात्पुरत्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. PCB आणि PCM ग्रुपचे निकाल 16 जून 2025 रोजी लागतील. B.BCA, LLB आणि B.Design सारख्या इतर अभ्यासक्रमांचे निकाल मे ते जून दरम्यान जाहीर केले जाणार असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे.
आता सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतिक्षा आहे. हे निकाल एमएचटी सीईटी सेलच्या cetcell.mahacet.org या वेबसाईटवर विद्यार्थी ऑनलाइन तपासू शकतील किंवा त्याचा स्क्रिन शाॅटही घेऊ शकणार आहेत. आता हा निकाल कसा पाहायचा आणि तो कसा तपासायचा याची माहिती बहुतांश विद्यार्थ्यांना नसते, म्हणूनच आम्ही तुम्हाला काही टप्पे सांगणार आहोत, ते तुम्ही फाॅलो करुन तुमचा निकाल पाहू शकता.

MHT CET २०२५ चा निकालाची तात्पुरती तारीख
PCM आणि PCB ग्रुपचा MHT CET निकाल येत्या 16 जून 2025५ रोजी जाहीर होण्याची शक्यता असून B.BCA/BBA/BMS/BBM-CET आणि 5 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमाचा निकाल आज 4 जून रोजी तर B.Design-CET चा निकाल 9 जून 2025 तसेच 3 वर्षांचा LLB अभ्यासक्रम - 17 जून 2025 लागू शकतो.
एमएच सीईटीचा निकाल कसा तपासायचा?
- उमेदवारांनो सर्वात आधी MHT CET च्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
- तुम्ही ज्या कोर्ससाठी परीक्षा दिली होती त्यावर क्लिक करा.
- लॉगिन पेजवर जा आणि तुमची माहिती एंटर करा आणि सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल काळजीपूर्वक वाचा आणि तो डाउनलोड करा.
- भविष्यासाठी त्याची प्रिंट कॉपी सुरक्षित ठेवा किंवा त्याचा स्क्रिन शाॅट काढा.
किती विद्यार्थ्यांनी दिली MHT CET
पीसीबी ग्रुपच्या 3 लाख 1 हजार 72 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यापैकी 2 लाख 82 हजार 737 उमेदवारांनी परीक्षा दिली.
पीसीएम ग्रुप एकूण 4 लाख 64 हजार 263 नोंदणीकृत उमेदवारांपैकी 4 लाख 22 हजार 863३ उमेदवारांनी परीक्षा दिली.
येथे परीक्षेसंदर्भात तपासा अधिक माहिती
उमेदवारांना निकालाशी संबंधित नवीनतम आणि अधिक माहिती आणि अपडेटसाठी नियमित महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा - MAHACET च्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांना वेळोवेळी महत्वाच्या सूचना आणि माहिती कळू शकेल.
हेही वाचा : मोठी बातमी! NEET UG Answer Key 2025 जाहीर! NTA च्या वेबसाईटवरुन अशी करा अॅन्सर की डाउनलोड












Click it and Unblock the Notifications