मोठी बातमी! NEET UG Answer Key 2025 जाहीर! NTA च्या वेबसाईटवरुन अशी करा अॅन्सर की डाउनलोड
NEET UG Answer Key 2025 Released : एकीकडे पीजी नीट परीक्षा लांबणीवर पडल्याचे वृत्त जारी झाले असतानाच आता एनडीएने एक मोठी बातमी दिली आहे. NTA ने NEET UG 2025 प्रोव्हिजनल अॅन्सर की जारी केली आहे. आता ही अॅन्सर की उमेदवारांना neet.nta.nic.in वरून डाउनलोड करता येणार आहे.
नीटकडून ही महत्वपूर्ण माहिती जाहीर झाल्यानंतर आता अॅन्सर की द्वारे उमेदवार आता आपल्याला मिळणाऱ्या गुणांचा ठोस अंदाज लावू शकतात. त्यानंतर अंतीम अॅन्सर की जाहीर होण्यापुर्वी काही आक्षेप असेल तर विद्यार्थी ते नोंदवू शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (NEET UG) 2025 साठी पहिली अन्सर की जारी केली आहे. आक्षेप कालावधी पुर्ण झाल्यानंतर एनटीए पुन्हा अंतीम अॅन्सर की जारी करेल.
कुठे बघाल अॅन्सर की..? (NEET UG Answer Key)
नीट युजी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांचा अंदाज अॅन्सर की द्वारे लागू शकतो. त्यामुळे ही अॅन्सर की उमेदवार आता एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर उत्तर की तपासू शकतात.
आक्षेप नोंदवण्याची तारीख किती? NEET UG Answer Key
जर अॅन्सर की अथवा नमूद उत्तरांवर उमेदवारांना आक्षेप नोंदवायचे असेल तर एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर ते नोंदवू शकतात. उमेदवारांना आक्षेपासाठी विंडो उघडली असून 3 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत उमेदवार आपले आक्षेप नोंदवू शकतात. फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आलेल्याच आक्षेपांचा विचार केला जाणार आहे.
आक्षेप घेण्याआधी एका प्रश्नाला मोजा 200 रुपये!
मनीकंट्रोलनुसार, जर एखाद्या उमेदवाराला असे वाटत असेल की की मधील कोणतेही उत्तर चुकीचे आहे किंवा त्यांच्या रेकॉर्ड केलेल्या उत्तरात त्रुटी आहे, तर ते प्रति प्रश्न 200 रुपये शुल्क भरून ऑनलाइन आव्हान सादर करू शकतात. आक्षेप वैध असल्याचे आढळले तरीही हे शुल्क परतफेड करण्यायोग्य नाही. चॅलेंज कालावधी संपल्यानंतर, NTA उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व आक्षेपांची पुनरावलोकन करेल. जर कोणतेही आव्हान वैध असल्याचे आढळले तर अंतिम उत्तर कीमध्ये आवश्यक बदल केले जातील.
NEET UG 2025 Answer Key कशी तपासायची?
- अॅन्सर की अॅक्सेस करण्यासाठी सर्वप्रथम NEET UG ची अधिकृत वेबसाइट: neet.nta.nic.in ला भेट द्या.
- त्यानंतर NEET UG 2025 Answer Key असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून लॉग इन करा.
- तात्पुरती उत्तर की तुमच्या OMR प्रतिसाद पत्रकासह आणि रेकॉर्ड केलेल्या प्रतिसादांसह प्रदर्शित केली जाईल.
- अंदाजे गुणांच्या संदर्भासाठी आणि गणनासाठी कागदपत्रे डाउनलोड करा.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!









Click it and Unblock the Notifications