इस्त्रोमध्ये वैज्ञानिक व्हायचेय? नोकरीसाठी कोणता कोर्स करावा लागतो, काय पात्रता हवी जाणून घ्या सर्व
Career News how to become scientist in isro : इस्त्रो भारतीय अंतराळ संस्था जिने जगात आपला झेंडा अटकेपार नेऊन ठेवला आहे. अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या प्रचंड मेहनतीने इस्त्रोचा पर्यायाने देशाचाच मान वाढवला आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोमध्ये नोकरी करुन देशसेवा करावी असे कुणाला वाटत नाही..अनेकांचे स्वप्न असते की, इस्त्रोमध्ये आपण नोकरी करावी पण तिथे जाण्याच्या वाटाच अनेकदा माहिती नसते.
मंगळ चंद्रासह अवकाशात देशाचा झेंडा उंचावणारी संस्था इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आज जगातील सर्वात विश्वासार्ह अंतराळ संस्थांमध्ये गणली जाते. जेव्हा जेव्हा भारत एखादा उपग्रह प्रक्षेपित करतो किंवा चांद्रयान-3 सारखे मोठे यश मिळवतो तेव्हा देशातील तरुणांनाही या ऐतिहासिक संस्थेचा भाग होण्याची प्रेरणा मिळते.

इस्त्रोने आपली शंभरावी मोहिम काही महिन्यांपुर्वीच पुर्ण केली होती, याशिवाय चांद्रयान 3 मोहिम राबवून चंद्राच्या दक्षिण बाजूवर अटकेपार झेंडा रोवला होता. ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्त्रोसारख्या बड्या संस्थेत वैज्ञानिक होणे कुणाला आवडणार नाही.
दरवर्षी हजारो विद्यार्थी इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहतात, परंतु योग्य माहितीअभावी, अनेक वेळा ते योग्य दिशेने तयारी करू शकत नाहीत. जर तुम्हालाही या प्रतिष्ठित संस्थेत शास्त्रज्ञ बनून देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये योगदान द्यायचे असेल, तर तुमचे स्वप्न साकार करणारी संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या...
अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग जातो इस्त्रोत नोकरीकडे
अभियांत्रिकी शाखेत जर तुम्ही शिक्षण घेणार असाल तर ही वाट तुम्हाला इस्त्रोकडे नेऊ शकते यासाठी उमेदवारांनी बी.ई. असणे आवश्यक आहे. किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमची इच्छाशक्ती आवश्यक आहे.
इस्त्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी 'या' शाखांमधून पदवी हवी
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
- संगणक विज्ञान इलेक्ट्रिकल
- इंजिनिअरिंग उमेदवाराला किमान 65% गुण किंवा 6.84 CGPA असणे आवश्यक आहे.
इस्त्रोत वैज्ञानिक होण्यासाठी विज्ञान शाखेतून संधी
जर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित यासारखे विषय घेऊन जर पदवी अभ्यासक्रम पुर्ण केला असेल तर इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याचा मार्गही खुला आहे. यासाठी बी.एस्सी. एम.एस्सी. नंतर. किंवा तुम्हाला थेट इंटिग्रेटेड एम.एस्सी करावे लागेल. अभ्यासक्रम करता येतो.
हेही वाचा : ISRO ने रचला इतिहास; अंतराळात अशी केली कामगिरी की जगात ठरला चौथा देश...
हेही वाचा : इस्रोने पुन्हा एकदा इतिहास घडवला! SSLV चे यशस्वी प्रक्षेपण, जाणून घ्या का खास आहे मिशन












Click it and Unblock the Notifications