ISRO ने रचला इतिहास; अंतराळात अशी केली कामगिरी की जगात ठरला चौथा देश...
भारतीय शास्त्रज्ञांनी आज अवकाशात आणखी एक नवा किर्तीमान स्थापित केला आहे. स्पॅडेक्स मिशन अंतर्गत स्पेस डाँकिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग आज शास्त्रज्ञांनी यशस्वी करुन दाखवला आहे. या प्रयोगात दोन भारतीय उपग्रहांचे डाँकींग यशस्वी करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्याबद्दल इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.

नेमके काय केले?
स्पॅडेक्स (SPADEX) मिशनने अंतराळातील दोन उपग्रह एकमेकांना जोडले जातात. त्यातून भविष्यात होणाऱ्या अंतराळ मोहिमेत मनुष्यबळ असणाऱ्या यानांना फायदा होतो. याशिवाय अंतराळातील देखभाल, इंधन भरावाच्या कामांनाही फायदा होतो. भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो)ने स्पॅडेक्सचा हा प्रयोग यशस्वी केला आहे.
Congratulations to our scientists at @isro and the entire space fraternity for the successful demonstration of space docking of satellites. It is a significant stepping stone for India’s ambitious space missions in the years to come.
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2025
इस्त्रोचे यश कोणते?
इस्त्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पेस डाँकिंग एक्सपेरिमेंट मिशन लाँन्च केले होते. या अंतर्गत पीएसएलव्ही- सी६० राँकेटद्वारे पृथ्वीपासून ४७० किलोमिटर अंतरावर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले होते. हे अंतराळयान या मोहिमेत ७ जानेवारीला जोडले जाणार होते. परंतु ही मोहिम पुढे ढकलण्यात आली. ९ जानेवारीलाही तांत्रिक अडचण आली. त्यानंतर १२ जानेवारीला या दोन्ही यानांना एकमेकांपासून तीन मिटर अंतरावर आणण्यात आले. त्यानंतर पुन्हा या दोन्ही यानांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले.
SpaDeX Docking Update:
— ISRO (@isro) January 16, 2025
🌟Docking Success
Spacecraft docking successfully completed! A historic moment.
Let’s walk through the SpaDeX docking process:
Manoeuvre from 15m to 3m hold point completed. Docking initiated with precision, leading to successful spacecraft capture.…
काय होणार फायदा?
डाँकींगचा हा प्रयोग भारतीय शास्त्रज्ञांनी यशस्वी करुन दाखवला आहे. या डाँकींगचा फायदा भारताला होणार आहे. चंद्रावरील भारतीय मोहिम, चंद्रावरील नमुने परत आणणे, भारतीय अतराळ स्थानक तयार करणे, ते स्थानक चालविणे या सगळ्या मोहिमेत डाँकींग आवश्यक होती. ती यशस्वी झाली. डाँकींग यशस्वी करणारा भारत आता जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशियाने अशी डाँकींग यशस्वी केली होती.












Click it and Unblock the Notifications