Amazon India Recruitment : सणासुदीत अॅमेझाॅन इंडिया मध्ये बंपर भरती! तब्बल 1.5 लाखाहून अधिक नोकऱ्या
Amazon India Recruitment : ऐन सणासुदीच्या काळात अॅमेझाॅन इंडियाने नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. पाचशेस हजार नव्हे तर तब्बल दीड लाखांहून अधिक तात्पुरत्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. ही भरती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन्ही प्रकारच्या पदांसाठी आहे.

नोकरीची संधी कुठे
यासह अॅमेझाॅन इंडिया देशभरातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये दिड लाख नोकरदारांची भर घालणार आहे.यामध्ये भारतातील त्यांच्या फुलफिलमेंट सेंटर्स (गोदामे), सॉर्ट सेंटर्स (वितरण केंद्रे) आणि लास्ट-माईल डिलिव्हरी नेटवर्क येथे नोकरी असेल. या वाढीव मनुष्यबळाच्या मदतीने अॅमेझाॅन या पीक सिझनमध्ये १६ लाखांहून अधिक विक्रेत्यांना सेवा देणार आहे.
ऍमेझॉन इंडियात १.५ लाखाहून अधिक नोकऱ्या
अॅमेझाॅनने या भरतीमध्ये महिला आणि २ हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना (PWDs) संधी देऊन सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले आहे. सणासुदीच्या गर्दीसाठी यातील बहुतांश नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक आधीच करण्यात आली आहे. अॅमेझाॅनचे देशभरातील फुलफिलमेंट आणि डिलिव्हरी नेटवर्क मजबूत असून, १५ राज्यांमध्ये ४३ दशलक्ष क्यूबिक फूटपेक्षा जास्त स्टोरेज जागा उपलब्ध आहे.
अॅमेझाॅनच्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये जवळपास २ हजार अॅमेझाॅन-संचालित आणि पार्टनर डिलिव्हरी स्टेशन्स आहेत. याशिवाय, २८,००० 'आय हॅव स्पेस' (I Have Space) आणि अनेक ऍमेझॉन फ्लेक्स पार्टनर (Amazon Flex partners) आहेत जे देशभरातील ग्राहकांपर्यंत पॅकेजेस सुरक्षितपणे पोहोचवण्याचे काम करतात. नवीन नियुक्त कर्मचारी ऍमेझॉनच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी पॅकेजेसची योग्य प्रकारे निवड, पॅकिंग, शिपिंग आणि डिलिव्हरी करण्याचे काम करतील.
टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये नोकरीच्या संधी
गेल्या काही महिन्यांपासून, अॅमेझाॅनने आपल्या भारतीय ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये २३३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २००० कोटी रुपये) ची मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा एक भाग म्हणून त्यांनी टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये पाच नवीन फुलफिलमेंट सेंटर्स आणि ३० नवीन डिलिव्हरी स्टेशन्स सुरू केली आहेत.
पगार आणि इतर फायदे
अर्ली ऍक्सेस टू पे (EATP) कार्यक्रम: हा कार्यक्रम कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ ते २० तारखेदरम्यान त्यांच्या मूळ पगाराच्या ८०% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा देतो, ज्यामुळे त्यांना कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक लवचिकता मिळते.
साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर सुट्ट्या : कर्मचाऱ्यांना दर आठवड्यात दोन सुट्ट्या मिळतात, तसेच लागू कायद्यांनुसार अनिवार्य आणि ऐच्छिक सुट्ट्या, वार्षिक रजा, आजारपणामुळे सुट्ट्या आणि प्रासंगिक रजा मिळतात.
सुरक्षा लाभ: यामध्ये भविष्य निर्वाह निधी (PF), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि कायद्यानुसार ग्रॅच्युइटी लाभांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications