Rent-a-bank-account scam : रेंट-ए-बँक-अकाउंट घोटाळा काय आहे, ते कसे काम करते? नेमका धोका काय?
What is Rent-a-bank-account scam, Know Details in Marathi : बॅंक खाते भाड्याने देणे ही काही कायदेशीर प्रक्रिया नाही, ही एक बेकायदेशीर प्रक्रिया आहे. सोशल मीडिया-नेतृत्वाखालील व्यवस्थांद्वारे हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून फोफावत चालला आहे. यामध्ये प्रामुख्याने खातेधारकांना जलद आणि सहज पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु, यामध्ये गुन्हेगारी बाबींचा मोठा प्रकार उघडकीस येत आहे.
बँक खाते भाड्याने देणे म्हणजे काय?
एखाद्याचे बँक खाते दुसऱ्याला वापरण्यासाठी देणे. ज्या व्यक्तीचे बॅंक खाते आहे, त्याला एक मोठी रक्कम दिली जाते. किंवा विविध पद्धतीने त्याला आर्थिक लाभ दिला जातो. खातेधारकांना त्यांच्या खात्यांद्वारे व्यवहार केलेल्या निधीच्या 1 ते 5 टक्के किंवा मोठ्या प्रमाणात एकाच वेळी मोठी रक्कम दिली जाते. काही बॅंक खाते काही दिवसांसाठी वापरण्यास दिली जातात. तेव्हा त्याचा काही भाग हिस्सा त्या खातेधारकाला दिला जातो. परंतु, या सर्व प्रकारांमध्ये आता मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

मोठ्या रकमेंचा होता व्यवहार!
बॅंक खाते भाड्याने दिले जाते, या प्रकारात प्रामुख्याने मोठ्या रकमेचे व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. साधारणपणे, एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल केली जाते. त्यामुळे खातेधारकाला दररोज 50 हजार ते एका लाखापर्यंत कमिशन देण्याचे आश्वासन दिले जाते. कधीकधी फसवणूक करणारे समोरासमोरच्या व्यवहारांसाठी प्रवास आणि राहण्याचा खर्च यासारखी अतिरिक्त भरपाई देखील देऊ करतात. यामध्ये खातेधारकाला पैसे काढणे आणि सांगितलेल्या ठिकाणी नेऊन पोहोच करणे, ही कामे करावी लागतात.
ज्याला पैशाची निकड अशांना धरले जाते
खाते भाड्याने घेण्याच्या या घोटाळ्यामध्ये प्रामुख्याने या सर्व साखळीतील लोक बरोबर अशा लोकांना हेरतात, ज्यांना पैशांची खूप गरज असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, ज्यांची नोकरी गेली आहे. ज्याला हॉस्पिटलमधील बिलांचा मोठा खर्च लागतो आहे. किंवा सोशल मीडियाचा वापर करून अशा छोट्या व्यावसायिकांशी संपर्क साधला जातो. अशाच या प्रकारांमध्ये मोठा घोटाळा व खातेधारकाची फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. ऑपरेटर त्यांना त्यांच्या बँक खात्याचे लॉग-इन तपशील शेअर करण्यास सांगतात आणि खात्याशी जोडलेले सिम कार्ड मेल करतात, ज्यावर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवले जातात. खातेधारक त्यांच्या दैनंदिन वापरासाठी पर्यायी क्रमांक निवडतात.
ही खाती कशासाठी वापरली जातात?
या खात्यांचा वापर प्रामुख्याने शेअर बाजारातील घोटाळेबाज किंवा मनी लाँडरिंग करणारे यांसारख्या कामांसाठी वापरला जातो. मोठी रक्कम या खात्यातून त्या खात्यांमध्ये वळविण्यासाठी या खात्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. काही मीडियाच्या अहवालातून समोर आले की, भाड्याने दिलेले खाते हे प्रामुख्याने "गेमिंग मनी" राउटिंग करण्यासाठी, स्टॉकशी संबंधित हॉट मनी राउटिंग करण्यासाठी आणि तिसरे म्हणजे विविध कामांसाठी वापरले जाते.
खातेधारकांना येणाऱ्या पैशांच्या स्त्रोतांविषयी अंधारात ठेवले जाते?
मुळात, ज्यांचे खाते भाड्याने वापरण्यासाठी दिले जाते, अशा खातेधारकांना निधीच्या स्रोताबद्दल नेहमीच अंधारात ठेवले जात असते. त्यांच्या खात्यांमध्ये लाँडरिंग केलेले पैसे किंवा शेअर बाजारात पंप-अँड-डंप घोटाळा करून मिळवलेला नफा आहे की बेकायदेशीर गुंतवणूक सल्ला देऊन किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृतीद्वारे मिळवलेला नफा आहे, हे त्यांना कळण्याचा कोणताही मार्ग माहिती नसतो.
सहसा कोणती खाती भाड्याने घेतली जातात?
फसवणूक करणारे सामान्यतः कॅश-मॅनेजमेंट उत्पादने (CMPs) किंवा कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CMS) आणि/किंवा मर्चंट QR (MQR) कोड असलेली चालू खाती शोधतात. सीएमपी किंवा सीएमएस एका क्लिकवर अनेक खात्यांमध्ये पेमेंट करण्याची परवानगी देऊन मोठ्या प्रमाणात पेमेंट सोपे केले जाते. व्यवहार सुलभ करण्यासाठी MQR कोड असलेली खाती देखील वापरली जातात.












Click it and Unblock the Notifications