Trump's 25 percent tariff : डोनाल्ड ट्रम्पच्या 25 टक्के टॅरीफमुळे भारतात 'या' वस्तू होऊ शकतात महाग!
Trump's 25 percent tariff may hit India's pharma clothing jewelry sectors :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यानंतर जगाची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे इस्त्रायल-इराण युद्धात भारत - पाक युद्धात नको ते वक्तव्य अन् दावे तर दुसरीकडे टॅरीफ धोरण यामुळे अमेरिकेतीलच नाहीतर जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी उद्या १ ऑगस्टपासून होणार आहे. या पार्श्वभुमीवर आता त्याचे परिणाम महागाईच्या रुपात भारतावर होत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी उत्पादनावर भारतात जगाच्या तुलनेत सर्वात जास्त आणि कठोर कर आहेत असे म्हटले आहे. हे आर्थिक धोरण चुकीचे असून व्यापारातील अडथळे आहेत म्हणून भारत १ ऑगस्टपासून कर भरेल असे म्हटले आहे. याचसंदर्भातील डोनाल्ड ट्रम्प यांची एक्सवरील पोस्ट सध्या चर्चेत आहे, ज्यात त्यांनी भारतावर आरोप केले आहेत.

ट्रम्प यांच्या एक्सपोस्टनुसार, ते म्हणतात की, "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्यासोबत तुलनेने कमी व्यवसाय केला आहे त्याचे एक कारण म्हणजे त्यांचे कर खूपच जास्त आहेत, जगातील सर्वात जास्त कर आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठोर आणि आर्थिकदृष्ट्या चुकीचे व्यापारविषयक अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह रशियाचा ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमधील हत्याकांड थांबवावे असे वाटते - सर्व काही चांगले नाही! म्हणून भारत १ ऑगस्टपासून २५% कर भरेल, तसेच वरील दंड भरेल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."
आता ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार, भारतात त्याचे परिणाम होऊ शकतात, हे भारतीय अधिकारी अनुमान लावत आहेत. तर आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ या निर्णयाचे नेमके काय परिणाम होतील याबद्दल इशाराही देत आहेत. यातील काही अंदाजानुसार, निर्यात व जड क्षेत्रातील गुंतवणूकदारांवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले आहे. मिंटच्या वृत्तानुसार,तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, भारताच्या निर्यात-चालित क्षेत्रांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ट्रम्पंच्या टॅरीफ बाॅम्बचा या क्षेत्राला फटका
- देशाच्या आर्थिक उत्पादनात अमेरिकेच्या निर्यातीचा एकूण वाटा कमी असल्याने भारताच्या जीडीपीला थेट फटका मर्यादित असू शकतो.
- टॅरीफचे टेक्स्टस्टाईल, कापड, औषधनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी उत्पादने आणि यंत्रसामग्री यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे.
- दागिने क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा निर्णय भारतातील रत्न आणि दागिने उद्योगासाठी एक "मोठा धक्का" आहे.
- नव्याने जाहीर केलेल्या २५% अमेरिकन टॅरिफचा भारतीय आयटी सेवा क्षेत्रावर थेट परिणाम होत नसला तरी, त्याचे परिणाम लक्षणीय असू शकतात.
मिंटने नमूद केले की, नुवामा यांनी या घडामोडी गुंतवणूकदारांची खबरदारी वाढवू शकतात असे म्हटले आहे. वाढीव टॅरिफमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये जोखीम टाळण्याची शक्यता वाढू शकते, विशेषतः अशा वेळी जेव्हा भारताचा देशांतर्गत वापर मंदावलेला असतो. फार्मा, ऑटो अॅक्सिलरीज, औद्योगिक आणि टाइल्स सारख्या क्षेत्रांमध्ये - जे अमेरिकेच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत - लक्षणीय अस्थिरता दिसून येऊ शकते.
टॅरिफचा काय परिणाम होईल?
गुड रिटर्न्सनुसार, २५% कराचा परिणाम अमेरिकेला होणाऱ्या अनेक भारतीय निर्यातीवर होईल, जसे की कपडे, मशीन, औषधे आणि ऑटो पार्ट्स. त्याशिवाय, अतिरिक्त "दंड" मध्ये अधिक नियम किंवा मर्यादा असू शकतात. भारतीय निर्यातदारांसाठी, विशेषतः जे आधीच जागतिक समस्यांशी झुंजत आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे.












Click it and Unblock the Notifications