टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सने SCV मार्केटमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सादर केला ACE Pro
Tata ACE Pro हा भारतातील सर्वात परवडणारा चार फोर-व्हील मिनी ट्रक आता नव्या रूपात सादर करण्यात आला आहे. पेट्रोल, बाय-फ्युएल आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा ट्रक वेगाने व सातत्यपूर्ण काम करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. व्यवसायाची सुरुवात असो किंवा विस्तारीकरण, हा छोटा ट्रक मोठ्या संधींसाठी सज्ज आहे.

शहरी लॉजिस्टिक्सच्या वेगवान जगात आकार, गती आणि टिकाव याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ई-कॉमर्स झपाट्याने वाढत असताना आणि लास्ट-माईल डिलिव्हरी आधुनिक व्यवसायाची गरज बनत असताना, व्यवसायांना आता हलकी, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहने आवश्यक आहेत. या पार्श्वभूमीवर Tata ACE Pro सादर करण्यात आला आहे.
हा कमी कार्बन उत्सर्जनासह उच्च कामगिरी देण्यासाठी खास डिझाइन करण्यात आलेला पुढच्या पिढीचा छोटा व्यावसायिक वाहन पर्याय आहे. कॉम्पॅक्ट असूनही दमदार असलेला ACE Pro हा टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सकडून सादर करण्यात आलेला एक प्रभावी पर्याय आहे, जो भारतातील लास्ट-माईल मोबिलिटीच्या संकल्पनेला नवा आकार देणार आहे.
तुम्ही अनुभवी फ्लीट ऑपरेटर असाल किंवा पहिल्यांदाच व्यवसायात उतरत असाल, Tata ACE Pro चा लाइन-अप म्हणजे पेट्रोल, बाय-फ्युएल (सीएनजी + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असलेला हा मिनी ट्रक आजच्या बदलत्या लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन खास तयार करण्यात आला आहे.
एक वारसा, नव्या रूपात
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सने जवळपास दोन दशकांपूर्वी मूळ Tata ACE सादर करून छोट्या ट्रकची एक नवी श्रेणी निर्माण केली होती. या वाहनाने देशभरात 25 लाखांहून अधिक उद्योजकांना सक्षम केले. Tata ACE Pro या नव्या मॉडेलमुळे हा वारसा आणखी बळकट होत आहे. केवळ ₹3.99 लाख या किमतीपासून उपलब्ध असलेला Tata ACE Pro हा भारतातील सर्वात परवडणारा फोर-व्हील मिनी ट्रक असून, कामगिरी, नफा आणि प्रगती यासाठी खास तयार करण्यात आला आहे.
"नव्या पिढीतील स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकांसाठी नव्या उद्दिष्टांसह आमचा वारसा पुढे नेत आहोत, हे Tata ACE Pro सादर करताना अधिक ठामपणे जाणवत आहे," असे टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले.
तुमच्या गरजेनुसार पॉवर निवडा : पेट्रोल, बाय-फ्युएल किंवा इलेक्ट्रिक
बहुउपयोगी मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित Tata ACE Pro तीन कार्यक्षम व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे -
- पेट्रोल : 694cc क्षमतेचे मजबूत इंजिन 30bhp पॉवर आणि 55Nm टॉर्क देतो. सामान्य मालवाहतुकीसाठी आवश्यक असलेली ताकद आणि इंधन बचत यांचा उत्तम समतोल साधतो.
- बाय-फ्युएल (सीएनजी + पेट्रोल) : खर्चाबाबत जागरूक असलेल्या ऑपरेटर्ससाठी हा पर्याय आदर्श आहे. सीएनजी मोडमध्ये 26bhp पॉवर आणि 51Nm टॉर्क मिळतो. यासोबत 5 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी दिली असून, त्यामुळे रेंज वाढते आणि वापरणे अधिक सोयीचे होते.
- इलेक्ट्रिक (ईव्ही) : 38bhp पॉवर, 104Nm टॉर्क आणि एका चार्जमध्ये 155 किमी रेंज असलेला ACE Pro EV शहरी लॉजिस्टिक्ससाठी अत्यंत योग्य आहे. यामध्ये IP67 रेटिंग असलेली बॅटरी व मोटर असून, सर्व प्रकारच्या वातावरणात स्थिर आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो.
अधिक उपयुक्त पेलोड क्षमता
750 किलोची बेस्ट-इन-क्लास पेलोड क्षमता आणि 6.5 फूट (1.98 मीटर) लांबीचा लोड डेक असलेल्या ACE Pro मध्ये छोट्या प्रमाणातील मालवाहतुकीसाठी भरपूर ताकद आहे. फॅक्टरीतूनच फ्लॅटबेड किंवा हाफ-डेक पर्याय मिळतो आणि हे वाहन कंटेनर, रीफर आणि म्युनिसिपल बॉडी फिटमेंटसाठीही योग्य आहे. त्यामुळे ई-कॉमर्सपासून कोल्ड-चेन सप्लायपर्यंत सर्व क्षेत्रांसाठी हे वाहन उपयुक्त ठरते.
ड्रायव्हरच्या आरामदायीपणाचा विचार करून केलेले डिझाइन
शहरातील रस्त्यांवर सतत ड्रायव्हिंग किंवा खडबडीत मार्गांवर लांब शिफ्टमध्ये काम करताना आराम महत्त्वाचा ठरतो - आणि ACE Pro ही गरज भागवतो. मोकळे-प्रशस्त आणि शरीराच्या हालचालींशी सुसंगत असलेले केबिन, भरपूर स्टोरेज स्पेस आणि AIS096 मानकांनुसार क्रॅश-टेस्ट केलेलं सुरक्षित डिझाइन यात देण्यात आले आहे. ड्रायव्हरला पुढील फिचर्सचा लाभ मिळतो :
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- इन्फोटेनमेंट सिस्टिम पर्याय उपलब्ध
- आरामदायक सीटिंग, ज्यामुळे थकवा कमी येतो
हे केवळ फिचर्स नाहीत, तर हे असे घटक आहेत जे ताण कमी करतात, सुरक्षितता वाढवतात आणि उत्पादकतेत भर घालतात.
व्यवसाय पुढे नेणारे तंत्रज्ञान
Tata ACE Pro ला टाटा मोटर्सच्या Fleet Edge या प्लॅटफॉर्मचे बॅकअप लाभले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतभरातील 8 लाखांहून अधिक वाहने कनेक्टेड आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढील सुविधा मिळतात :
- वाहनाची स्थिती रिअल-टाइममध्ये तपासता येते
- ड्रायव्हरच्या वागणुकीवर लक्ष ठेवता येते
- वेळेआधीच देखभाल-संबंधी अलर्ट मिळतात
- गिअर शिफ्ट अॅडव्हायझर आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टन्ससारखे नॅव्हिगेशन टूल्स
फ्लीट मालक आणि ट्रान्सपोर्टर्ससाठी याचा अर्थ हा की, अधिक वेळ वाहन सुरू राहते, इंधनाचा वापर अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येतो आणि एकूण खर्च कमी होतो.
देशभरातील मजबूत नेटवर्क, सहज मालकी अनुभव
2,500 हून अधिक सर्व्हिस व स्पेअर आऊटलेट्स आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचलेलं स्टार गुरू नेटवर्क यामुळे Tata Motorsतर्फे विनाअडथळा पाठिंबा मिळतो. इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास वर्कशॉप्स आणि 24x7 रोडसाइड असिस्टन्स उपलब्ध असल्यामुळे तुमचा व्यवसाय खंड न पडता सुरू राहतो.
अर्थसहाय्याची गरज आहे? टाटाने आघाडीच्या बँका आणि एनबीएफसींशी भागीदारी करून खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत :
- जलद कर्ज मंजुरी
- लवचिक ईएमआय योजना
- गरजेनुसार अर्थसहाय्याचे पर्याय
तुम्हाला हवा असलेला ACE Pro व्हेरियंट फ्लीट व्हर्स या टाटाच्या डिजिटल सेल्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन बुक करता येतो किंवा तुम्ही देशभरातील 1,250 व्यावसायिक वाहन डिलरशिपपैकी कोणत्याही ठिकाणी भेट देऊन बुकिंग करू शकता.
आधुनिक भारताच्या वेगासाठी खास तयार
Tata ACE Pro सीरिज, विशेषतः EV व्हेरियंट, आजच्या झपाट्याने वाढणाऱ्या लास्ट-माईल डिलिव्हरी अर्थव्यवस्थेसाठी डिझाइन करण्यात आली आहे. किराणा सामान, कुरिअर, मोबाइल विक्री केंद्रे किंवा कोल्ड-चेन लॉजिस्टिक्स असो, प्रत्येक व्हेरियंट भारतातील उद्योजकांच्या वेगवेगळ्या गरजा समर्थपणे भागवतो.
"मल्टी-फ्युएल पर्याय, परवडणारी किंमत आणि अधिक चांगला ड्रायव्हिंग अनुभव यामुळे Tata ACE Pro विविध उपयोगांसाठी अधिक उपयुक्त ठरतो," असे टाटा मोटर्सचे व्हाइस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड - SCVPU पिनाकी हलदार यांनी नमूद केले.
एकच प्लॅटफॉर्म, असंख्य स्वप्ने
तुम्ही डिलिव्हरी व्यवसाय सुरू करणारे गिग वर्कर असाल किंवा फ्लीट चालवणारे मोठे उद्योजक, Tata ACE Pro हा तुमचा विश्वासू साथीदार ठरतो. प्रत्येक प्रकारच्या इंधनाच्या पर्याय, स्मार्ट तंत्रज्ञान आणि उद्योगातील आघाडीची सेवा-सुविधा यांसह, हा केवळ एक ट्रक नाही तर तो संधीचा प्लॅटफॉर्म आहे.
Tata ACE Pro: पेट्रोल. सीएनजी. ईव्ही. एक व्हिजन.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications