SBI Lakhpati Yojana : एसबीआयची हर घर लखपती योजना काय आहे?, किती गुंतवणूक करायची?
SBI Har Ghar Lakhpati Yojana : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय (SBI) च्या वतीने 'हर घर लखपती' ही विशेष आवर्ती ठेव अर्थात आरडी योजना चालवती जात आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही दरमहा लहान रक्कम जमा करून 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करू शकता. त्यामुळे ही योजना नेमकी कशी काम करते यावर एक नजर टाकूया, अन् समजून घेऊया.

आरडी म्हणजे काय?
रिकरिंग डिपॉझिट किंवा आरडी तुम्हाला मोठी बचत करण्यास मदत करू शकते. तुम्ही ते पिगी बँकेसारखे वापरू शकता.
याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला तुमचा पगार मिळेल, तेव्हा दर महिन्याला त्यात एक निश्चित रक्कम गुंतवत राहा आणि जेव्हा ती परिपक्व होईल, तेव्हा तुमच्या हातात मोठी रक्कम असेल.
हर घर लखपतीचा परिपक्वता कालावधी साधारणपणे 3 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत असतो. म्हणजेच तुम्ही 3 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
कोण गुंतवणूक करू शकते?
या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. व्यक्ती त्यात एकटे किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकतात. त्याचवेळी, पालक त्यांच्या मुलासह खाते उघडू शकतात.
आरडीमधून मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. जर रिकरिंग डिपॉझिट (RD) मधून मिळणारे व्याज उत्पन्न 40 हजार रुपयांपर्यंत असेल (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50 हजार रुपये), तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर 10% टीडीएस कापला जातो.
किती टक्के व्याज दिले जाते?
यामध्ये, सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त 6.75% वार्षिक व्याज दिले जात आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7.25% वार्षिक व्याज दिले जात आहे.
.. तर फॉर्म 15 एच-15 जी सबमिट करा
जर तुमचे RD मधून मिळणारे वार्षिक व्याज उत्पन्न 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, परंतु तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न (व्याज उत्पन्नासह) करपात्र पातळीवर नसेल, तर बँक TDS कापत नाही.
यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँकेत फॉर्म 15 एच आणि इतरांना फॉर्म 15 जी सादर करावा लागेल. फॉर्म 15जी किंवा फॉर्म 15 एच हा एक स्व-घोषणा फॉर्म आहे. यामध्ये तुम्ही असे म्हणता की तुमचे उत्पन्न कर मर्यादेबाहेर आहे, असे स्वपत्र तुम्ही देतात.












Click it and Unblock the Notifications