मोठी बातमी! 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा येणार; जुन्या नोटांचे काय होणार? कशा आहेत नव्या नोटा?
रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पदभार स्विकारला. त्यापूर्वी शक्तीकांत दास हे रिझर्व बँकेचे सहा वर्षे गव्हर्नर होते. मल्होत्रा यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली. आता १० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलणात येतील, अशी माहिती रिझर्व बँकेकडून देण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यांत मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेल्या १०० व २०० रुपयांच्या नोटा बाजारात आल्या होत्या.

कशासाठी बदलणार नोटा?
सध्या स्थिर सरकार आल्याने अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच, महागाई दर कमी झाला आहे. व्याजदर कमी करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. शिवाय परंपरेनुसार नवीन गव्हर्नर आल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीच्या नवीन नोटाही चलनात आणण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच महात्मा गांधींची नवी प्रतिमा असलेल्या १० व ५०० रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या जाणार आहेत.
पूर्वीच्या नोटांचे काय होणार?
या नोटांची रचना महात्मा गांधी नवीन मालिकेतील १० आणि ५०० रुपयांच्या नोटांसारखीच असेल, असे केंद्रीय बँकेने एका निवेदनात सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जारी केलेल्या सर्व १० रुपयांच्या नोटा वैध राहतील. त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या नवीन मालिकेत पूर्वी जारी केलेल्या ५०० रुपयांच्या नोटा देखील वैध राहतील. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने गव्हर्नर मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जारी करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच सध्या बाजारात चलनात असलेल्या सर्व नोटा या पूर्वीप्रमाणेच चलनात राहतील, असे सांगण्यात आले आहे.
रेपो दरही होणार कमी
रिझर्व्ह बँकेची (RBI) MPC बैठक ७ एप्रिलपासून सुरू होत आहे. RBI गव्हर्नरने धोरणात्मक दराबाबत घेतलेला निर्णय ९ एप्रिल रोजी जाहीर केला जाईल. ही बैठक चालू आर्थिक वर्षातील पहिली बैठक असेल. म्हणूनच ते खूप महत्वाचे मानले जात आहे. या बैठकीत रेपो दर पुन्हा एकदा ०.२५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यावेळीही रेपो दर कमी केला गेला, तर रेपो दर कमी होण्याची ही सलग दुसरी वेळ असेल. सध्या ते ६.२५ टक्क्यांच्या पातळीवर आहे. यावेळीही जर २५ बेसिस पॉइंट्सची कपात झाली तर ती ६ टक्क्यांपर्यंत घसरेल.
एमपीसीची ७ एप्रिलपासून बैठक
यावेळी रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ७ एप्रिलपासून सुरू होईल आणि ९ एप्रिल रोजी आरबीआय गव्हर्नर पॉलिसी रेटबाबत घोषणा करतील. ही बैठक चालू आर्थिक वर्षातील पहिली बैठक असेल. मल्होत्रा डिसेंबर २०२४ मध्ये आरबीआय गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांनी शक्तीकांत दास यांची जागा घेतली, जे त्यांचा विस्तारित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदावरून पायउतार झाले होते.












Click it and Unblock the Notifications