Ratan Tata :रतन टाटा यांच्या निधनाचा टाटा शेअर्सवर काय परिणाम झाला? कोणते शेअर पडले कोणते वाढले वाचा
Ratan Tata Death Impacts on shares and stock markcet : उद्योग जगतातील महान हस्ती आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे काल रात्री निधन झाले. त्यानंतर आज 10 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारातील टाटा ग्रुपच्या शेअरवर परिणाम झाला आहे. तसे पाहिले तर आज शेअर बाजाराची सकाळी वाटचाल दमदार होती. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनामुळे बाजार उघडताच सर्वांच्या नजरा टाटाच्या शेअर्सकडे लागल्या आहेत. कोणते शेअर पडले कोणते वधारले हे आपण जाणून घेऊया.
टाटा ग्रुपच्या 16 कंपन्यांचे शेअर्स लिस्ट झाले आहेत. या शेअर्समध्ये जोरदार हालचाली दिसत आहे. यामध्ये TCS, Tata Investment, Trent, Tata Motors, Tata Technologies आणि इतर समभागांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. आज बाजार बंद झाल्यानंतर, TCS सप्टेंबर तिमाहीचे निकाल देखील प्रसिद्ध करेल.

टाटा समूहाच्या शेअर्सची स्थिती
दुपारी 12.15 वाजता, TCS चे शेअर्स BSE वर सुमारे एक टक्क्यांच्या बळावर 4285 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 15.38 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टीलचा शेअर किंचित वाढीसह 159 रुपयांवर आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स थोड्या घसरणीसह 933 रुपयांवर व्यवहार करत आहेत. टायटन कंपनीचे शेअर्स सुमारे एक टक्क्यांच्या घसरणीसह 3461 रुपयांच्या भावाने व्यवहार करत आहेत.
हेही वाचा : रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, सरकार पाठवणार केंद्राकडे प्रस्ताव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- टाटा केमिकलचा शेअर जवळपास 6 टक्क्यांच्या वाढीसह 1171 रुपयांवर व्यवहार करत आहे.
- टाटा पॉवर कंपनीचे शेअर्सही 2 टक्क्यांच्या वाढीसह 470 रुपयांवर पोहोचले आहेत.
- इंडियन हॉटेल्स कंपनीच्या समभागांनी सुमारे 2 टक्के वाढीसह 706 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
- टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा शेअर किंचित कमकुवतपणाने 1115 रुपयांपर्यंत घसरला आहे.
- टाटा कम्युनिकेशनचे शेअर्स अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढीसह 1965 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
- व्होल्टासचा शेअर किंचित वाढीसह रु. 1789 वर व्यवहार करत आहे.
- ट्रेंट लिमिटेडचा शेअर 2.25 टक्क्यांनी घसरून 8088 रुपयांवर आला आहे.
- टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या समभागांनी सुमारे 11 टक्क्यांच्या तीव्र उडीसह 7244 रुपयांची किंमत गाठली आहे.
हेही वाचा : रतन टाटा श्रीमंत असूनही त्यांनी कधी श्रीमंतीचा तमाशा मांडला नाही - राज ठाकरेंची भावूक पोस्ट व्हायरल!
एक्सचेंज डेटानुसार, टाटा मेटालिक्सची किंमत 1111 रुपये आहे. Tata Elxsi चा शेअर सुमारे अडीच टक्क्यांच्या वाढीसह 7803 रुपयांवर गेला आहे. नेल्को लिमिटेडचा शेअर देखील सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह 1016 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअर सुमारे दीड टक्क्यांच्या वाढीसह 1065 रुपयांवर व्यवहार करत आहे.
हेही वाचा : रतन टाटांनी 26/11 हल्ल्यानंतर त्यांचा जेव्हा कुणीच उचलला नव्हता काॅल! ' पुन्हा उभारलं 'ताज' हाॅटेल












Click it and Unblock the Notifications