PM मोदींची मोठी घोषणा! प्रधानमंत्री विकसित भारत योजना आजपासून लागू तरुणांना मिळणार 15 हजार
PM modi announced pradhan mantri vikas bharat rojgar yojana scheme : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी लाल किल्ल्यावरुन देशबांधवांना संबोधन केले. यावेळी त्यांनी काही घोषणा केल्या, यापैकी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू झाली अशी घषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
देश आज स्वावलंबी बनत असून २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे ध्येय आहे असे म्हणत त्यांनी रोजगार, उद्योजकता, अर्थव्यवस्था, लखपती दिदी योजनेवर भाष्य केले यासह त्यांनी आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची औपचारिकरित्या घोषणा लाल किल्ल्यावरुन केली.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५ हजार रुपये प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी देशातील तरुणांना खुशखबर घेऊन आलो आहे, याद्वारे तरुणांना एक लाख कोटी रुपयांची योजना सुरु करत आहे.
तरुणांना मिळणार १५ हजार रुपये
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की, "आज १५ ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर देशाच्या युवकांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना आपण सुरु करत आहोत. आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत आहे. पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना पंधरा हजार रुपये मिळणार आहे. कंपन्यांनाही प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला जाईल."
साडेतीन कोटी तरुणांना फायदा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रधानमंत्री विकसित भारत योजनेद्वारे खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपये मिळणार असून जवळपास साडेतीन कोटी तरुणांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
दिवाळीत मोठी घोषणा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "या दिवाळीत मी तुमच्यासाठी दुहेरी दिवाळी बनवणार आहे... गेल्या आठ वर्षांत, आम्ही जीएसटीमध्ये मोठी सुधारणा केली आहे... आम्ही पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. यामुळे देशभरातील कराचा बोजा कमी होईल"
"..तर मोदी भिंतीसारखा उभा राहील" - पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले "भारतातील शेतकरी, मच्छीमार, पशुपालकांच्या हिताच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही धोरणासमोर मोदी भिंतीसारखे उभे आहेत..." शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांचे हित माझ्यासाठी प्राथमिकता आहे, त्यांचे विकासात मोठे योगदान आहे.
हेही वाचा : रक्त अन् पाणी.. अणु हल्ल्यावर पाकिस्तानला PM मोदींचा लाल किल्ल्यावरुन उघड इशारा! वाचा ठळक मुद्दे
हेही वाचा : Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची पेट्रोल डिझेलबाबत मोठी घोषणा! मिशन सुरु करणार












Click it and Unblock the Notifications