PM Kisan : 'या' चुकांमुळे थांबू शकतो तुमचा पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता! ही कामं पटापट करून घ्या!
PM Kisan 20th installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आधार देणारी मोठी योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना थोडे फार आर्थिक नियोजनात सहाय्य करणारी ठरते. शेतीच्या बियाण्यांपासून ते मशागतीच्या कामांपर्यंतच्या खर्चासाठी ही रक्कम वापरात येते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात, जे प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आता सगळ्यांच्या नजरा २० व्या किस्तीवर लागल्या आहेत.

ऑगस्ट २०२५ मध्ये पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक शेतकरी अजूनही त्यांना मागील हप्त्यांची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार करत आहेत. त्याला कारण आपले बँक खाते आणि आधारकार्ड असू शकते हे अनेकांना माहितच आहे असे नाही. त्यामुळे तुम्हाला मागील हप्ता का आला नाही आणि तुमचा या योजनेच्या लाभाचा पुढचा हप्ताही अडकू शकतो त्याचे एक मोठे कारण आहे म्हणूनच आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक असणे आवश्यक आहे. ते जर नसेल तर तुम्हाला या योजनेतील हप्ता मिळू शकणार नाही. आधार-बँक लिंकिंगचे महत्व काय हे जाणून घेऊया.
आधार-बँक लिंकिंग का महत्त्वाचे आहे?
- सरकार प्रत्येक हप्त्याची पडताळणी आधारद्वारे करते.
- जोपर्यंत आधार आणि बँक खाते व्यवस्थित जोडले जात नाहीत, तोपर्यंत रक्कम हस्तांतरित केली जात नाही.
- चुकीच्या व्यक्तीला पैसे मिळू नयेत यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे.
फक्त e-KYC पुरेसे नाही, आधार-बँक लिंकिंग आवश्यक
बहुतेक शेतकऱ्यांना वाटते की त्यांनी e-KYC पूर्ण केले आहे, त्यामुळे त्यांना पैसे मिळतील. परंतु, असे नाही. सरकार तुम्हाला पैसे तेव्हाच देते, जेव्हा तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी योग्य प्रकारे जोडलेला (लिंक केलेला) असतो. जर आधार-बँक लिंकिंग अपूर्ण असेल, तर तुमची किस्त थांबवली जाऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
जर तुम्हालाही पीएम किसान योजनेची किस्त मिळाली नसेल, तर लवकरात लवकर तुमच्या कागदपत्रांची तपासणी करा, बँकेकडून खात्री करून घ्या आणि वेबसाइटवर स्थिती तपासा. योग्य माहिती आणि सतर्कतेने तुम्हाला पुढील हप्ता वेळेवर मिळू शकते.
तुमची रक्कम कोणत्या कारणांमुळे अडकू शकते? समजून घ्या
- बँक खात्यात आधार क्रमांक अपडेट नसणे.
- आधार आणि बँक खात्यातील नाव किंवा जन्मतारीख यामध्ये फरक असणे.
- IFSC कोड किंवा खाते क्रमांकामध्ये चूक असणे.
- बँकेने आधार लिंकिंग सिस्टीममध्ये अपडेट न करणे.
हप्ता न मिळाल्यास काय कराल?
जर तुम्हाला किस्तीची रक्कम मिळाली नसेल, तर खालील गोष्टी लगेच करा.
बँकेला भेट द्या: तुमच्या बँकेत जाऊन तुमचा आधार तुमच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची चौकशी करा. जर नसेल, तर आधार कार्ड आणि पासबुक घेऊन त्वरित लिंकिंग करून घ्या.
स्टेटस तपासा: pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'Beneficiary Status' (लाभार्थी स्थिती) विभागात तुमच्या खात्याची स्थिती तपासा.
कागदपत्रांची पडताळणी: कृषी तज्ञांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये कागदपत्रांमधील छोट्या चुकाच मोठी अडचण बनतात. त्यामुळे, तुमचे सर्व दस्तऐवज - आधार, नाव, IFSC कोड, खाते क्रमांक - पूर्णपणे योग्य आणि जुळणारे आहेत याची खात्री करा.
२० वा हप्ता ऑगस्टमध्ये अपेक्षित
सरकारने अद्याप २० व्या हप्त्याची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही, परंतु अंदाजानुसार ती ऑगस्ट २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकते. मागील हप्ता मे २०२५ मध्ये देण्यात आला होती, आणि साधारणपणे दर चार महिन्यांनी एक हप्ता येतो.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications