LPG Price Cut: LPG गॅस सिलिंडरचे दर झाले कमी! 6 महिन्यात 'एवढा' मोठा फरक, फायदा काय? वाचा विश्लेषण
LPG Price Cut Commercial Gas Cylinder Cheaper : १ नोव्हेंबरपासून देशभरात एलपीजीच्या किमतीत कपात झाली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत, यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांना काहीसा दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी झाल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर दरात अनेक बदल झाले गेली चार महिने सिलिंडरचे दर उतरत गेले पण ऑक्टोबर महिन्यात दर वाढ झाली. त्यानंतर अंशतः दिलासा नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ग्राहकांना मिळाला आहे.

व्यावसायिक सिलिंडर : नवीन दर
तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी) मते, १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता दिल्लीत १,५९०.५० रुपयांना उपलब्ध झाला आहे, जो पूर्वी १,५९५.५० रुपयांपेक्षा कमी होता. म्हणजेच ५ रुपयांची कपात झाली असू मुंबईतही ५ रुपयांची आणि चेन्नईमध्ये ४.५० रुपयांची कपात सिलिंडर दरात झाली.
महाराष्ट्रातील गॅस दर
मुंबई (महाराष्ट्र) मध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचा नवा दर ₹१,५४२.०० आहे, तर घरगुती (१४.२ किलो) सिलेंडरचा दर ₹८५२.५० कायम आहे. इतर प्रमुख महानगरांच्या तुलनेत मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत सर्वात कमी आहे.
घरगुती LPG दरात कोणताही बदल नाही
सामान्य ग्राहकांना मिळणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील दरच कायम ठेवण्यात आले आहेत.
- शहर घरगुती LPG दर (रुपयात)
- दिल्ली - ₹८५३.००
- कोलकाता - ₹८७९.००
- मुंबई - ₹८५२.५०
- चेन्नई - ₹८६८.५०
- लखनऊ - ₹८९०.५०
गेल्या 6 महिन्यातील गॅस सिलिंडरच्या भावातील चढ-उतार : विश्लेषण
- या सहा महिन्यांच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये सातत्याने बदल दिसून आला आहे, ज्यात प्रामुख्याने मोठी कपात आणि त्यानंतर हलकी वाढ व पुन्हा कपात झाली आहे.
- मे महिन्याच्या सुरुवातीला दरात किरकोळ कपात झाली. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या सलग चार महिन्यांत किमतीत लक्षणीय घट झाली.
- जुलै महिन्यातील कपात (₹५८.५०) ही सर्वात मोठी होती, ज्यामुळे रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
- मे महिन्यात दिल्लीत ₹१,७४७.५० असलेला दर सप्टेंबरमध्ये कमी होऊन ₹१,५८०.०० पर्यंत आला होता, म्हणजेच या ४ महिन्यांत जवळपास ₹१६७.५० (मे १ ते सप्टेंबर १) ची कपात झाली.
- ऑक्टोबरमध्ये दरात मोठी वाढ : सहा महिन्यांच्या ट्रेंडमध्ये ऑक्टोबर महिन्यात मोठा ब्रेक लागला. सणासुदीच्या तोंडावर दरात ₹१५.५० (दिल्लीत) पर्यंत वाढ झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ झाली होती.
नोव्हेंबरमध्ये किरकोळ दिलासा : नोव्हेंबरमध्ये किमती पुन्हा घटल्या, पण ही कपात (₹५) किरकोळ होती. ऑक्टोबरमधील वाढीनंतर आलेली ही कपात सणासुदीच्या काळात दिलासा देणारी ठरली.
निष्कर्ष : मे ते सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती कमी झाल्याने भारतातील व्यावसायिक एलपीजी दरात मोठी कपात झाली. मात्र, ऑक्टोबरमधील वाढ जागतिक अस्थिरता दर्शवते, जी नोव्हेंबरमध्ये किरकोळ कपातीने स्थिर झाली आहे.
महाराष्ट्रातील दरातील चढ-उतार (मुंबई)
- १ मे २०२५: ₹१,६९९.००
- १ सप्टेंबर २०२५: ₹१,५३१.५०
- १ ऑक्टोबर २०२५: ₹१,५४७.०० (₹१५.५० वाढ)
- १ नोव्हेंबर १, २०२५: ₹१,५४२.०० (₹५.०० कपात)
मुंबईतही किमतींचा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडप्रमाणेच राहिला. मे पासून सप्टेंबरपर्यंत दरात ₹१६७.५० ची कपात झाली होती, तर ऑक्टोबरमध्ये ती परत वाढली.












Click it and Unblock the Notifications