LPG Price Hike अर्थसंकल्पापुर्वी महागाईची झळ! एलपीजी सिलिंडर 'एवढ्या' रुपयांनी महाग, वाचा नवे दर
LPG commercial gas Cylinder price hike 1 february 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि विशेषतः व्यावसायिकांना मोठा दणका दिला आहे. १ फेब्रुवारी रोजी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले असून, यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक सिलिंडरचा दर का वाढला?
'मनी कंट्रोल'नुसार, आजपासून देशातील प्रमुख महानगरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक (Commercial) सिलिंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या या सिलिंडरचे दर वाढल्यामुळे आता बाहेरचे जेवण महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महानगरांमधील नवे दर (१९ किलो सिलिंडर)
- मुंबई: मुंबईत कालपर्यंत १६४२.५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १६९२.०० रुपयांवर पोहोचला आहे (४९.५० रुपयांची वाढ).
- दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत हा दर आता १७४०.५० रुपये झाला आहे.
- कोलकाता: कोलकात्यात ग्राहकांना १८४४.५० रुपये मोजावे लागणार आहेत.
- चेन्नई: येथे सर्वाधिक ५० रुपयांची वाढ होऊन नवीन दर १८९९.५० रुपये झाला आहे.
घरगुती ग्राहकांना दिलासा, पण...
एकीकडे व्यावसायिक सिलिंडर महागला असताना, घरगुती वापराच्या (१४.२ किलो) गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर ८ एप्रिल २०२५ रोजी जे निश्चित करण्यात आले होते, त्याच दराने आजही गॅस उपलब्ध आहे. मात्र, व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे, कारण यामुळे खाऊ गल्ली आणि उपाहारगृहांचे दर वाढण्याची भीती आहे.
बजेटपूर्वीचा 'झटका'
आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वीच इंधन दरात झालेली ही वाढ 'बजेटपूर्वीचा मोठा झटका' मानली जात आहे. विशेष म्हणजे १ जानेवारीलाही काही प्रमाणात दरवाढ झाली होती, त्यानंतर आता पुन्हा ५० रुपयांची वाढ झाल्याने व्यावसायिक वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे.
व्यावसायिक विरुद्ध घरगुती सिलेंडर: फरक काय?
घरगुती सिलेंडर (१४.२ किलो) : हा प्रामुख्याने घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जातो. यावर सरकारकडून ठराविक नियमांनुसार सब्सिडी (सवलत) मिळते.
व्यावसायिक सिलेंडर (१९ किलो) : याचा वापर हॉटेल, बेकरी, कॅटरिंग आणि इंडस्ट्रियल युनिट्समध्ये केला जातो. यावर कोणतीही सब्सिडी मिळत नाही, त्यामुळे याचे दर घरगुती गॅसपेक्षा जास्त असतात.
हेही वाचा : . बजेट 2026: 15 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार? टॅक्स सवलतीसह रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी
हेही वाचा : निर्मला सीतारामन यांची लव्हस्टोरी माहित आहे..? JNU मध्ये मिळाला साथीदार आणि सापडले ध्येय












Click it and Unblock the Notifications