Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नोकरदारांनो सॅलरी अकाऊंटमधील 'या' फायद्याच्या गोष्टी माहितेय का? काय काय 'फ्रि' मिळते? घ्या जाणून

Know Salary Account Benefit : सॅलरी अकाऊंट हा प्रत्येक नोकरदाराशी संबंधित विषय. बँकेत जर कुणाला खाते काढायचे असेल तर अनामत रक्कम ठेवावी लागते ही रक्कम आता काही हजारांमध्ये असते आणि बॅलेन्स ठेवण्याचे बंधनही असते. त्यामुळे ही बाब प्रत्येकांनाच शक्य होते असे नाही पण सॅलरी अकाऊंट प्रत्येक नोकरदारांसाठी फायदा देणारी गोष्ट आहे. हे नेमके काय फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

नोकरदारांसाठी झिरो बॅलेन्स सुविधा

नोकरी करणाऱ्या प्रत्येक नोकरदाराचे सॅलरी अकाऊंट असते. सॅलरी खात्याला झिरो बॅलन्स अकाउंट देखील म्हणतात. झिरो बॅलेन्स म्हणजे या खात्यामध्ये तुमचा झिरो बॅलन्स असेल तरीसुद्धा तुमचे पैसे कापले जात नाहीत. कमीत कमी पैसे असण्याची अट नाही. सॅलरी आणि सेव्हिंग्ज या दोन प्रकारच्या खाते नोकरदारांचे असते. नोकरदार नसलेले सेव्हींग्ज अकाउंट उघडतात. त्यात कमीत कमी पैशांची लिमिट असते. परंतु सॅलरी अकाउंटमध्ये ही अट नाही. त्यातच ओव्हरड्राफ्ट सुविधाही फायद्याची आहे.

Know Salary Account Benefit

2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या सॅलरी अकाउंटवर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील मिळते. ओवरड्राफ्ट सुविधाची लिमिट ही कर्मचान्याच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढी असते. ओवरड्राफ्ट सुविधेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे खात्यात पैसे नसतील तरीसुद्धा तुम्हाला लिमिटपर्यंत पैसे काढता येणार आहेत.

पैसे कापले जात नाही, मिळते फ्री एटीएम

ज्या कर्मचाऱ्यांचे बँक सॅलरी खाते आहे, त्यांच्या अकाउंटवर खासगी क्षेत्रातील आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांकडून फ्री एटीएम सुविधा देण्यात येते. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक यांसारख्या अनेक बँका तुम्हाला फ्री एटीएम देतात. त्याचबरोबर फ्री एटीएमच्या सुविधेमध्ये तुमच्याकडून वार्षिक चार्ज घेतले जात नाहीत.

सॅलरी अकाउंटवर तुम्हाला कार लोन तसेच होम तीनवर स्पेशल ऑफर देखील मिळते. त्याचबरोबर सॅलरी अकाउंट वर तुम्हाला प्री-अप्रूव्ह लोन देखील मिळते. सेव्हिंग्ज अकाउंटच्या तुलनेतच सॅलरी अकाउंटवर कमी व्याज परताव्याची सुविधा देखील देते. सॅलरी अकाउंट असलेल्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच बँका मोफत पासबुक आणि चेकबुकची सुविधा देतात. याशिवाय इस्टेटमेंट आणि सॅलरी क्रेडिट झाल्यानंतर येणाऱ्या एसएमएसवर देखील कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही.

सॅलरी अकाऊंटवर मिळतो विमा

ज्या व्यक्तीचं सॅलरी अकाउंट असतं आणि त्याचा अचानक मृत्यू झाला तर, त्याच्या नातेवाईका किंवा घरच्यांना 20 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळतो. ही सुविधा प्रत्येक बँकेमध्ये सॅलरी अकाउंट असलेल्या व्यक्तीला लागू होते. त्याचबरोबर एसबीआय बँक आपल्या ग्राहकाला 30 लाख रुपयांपर्यंत एक्सिडेंट इन्शुरन्स कव्हरची सुविधा देते.: सॅलरी अकाउंट तुम्हाला ऑनलाइन ट्रांजेक्शनची सुविधा देते. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन ट्रांजेक्शन करून लाभ मिळवू शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+