ITR Filing : करदात्यांना मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत वेळ
ITR Filing Deadline for Audit Cases Extended : केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने करदात्यांना मोठा दिलासा देत आयकर रिटर्न -आयटीआर आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही मुदतवाढ मुख्यतः ज्या कंपन्या, भागीदारी संस्था आणि करदात्यांसाठी कर ऑडिट (Tax Audit) करणे अनिवार्य आहे, अशांसाठी लागू करण्यात आली आहे.
सीबीडीटीच्या ताज्या अधिसूचनेनुसार, आता ऑडिट केस अंतर्गत येणाऱ्या करदात्यांना ITR दाखल करण्यासाठी १० डिसेंबर २०२५ पर्यंत वेळ मिळाला आहे. या निर्णयामुळे कर सल्लागार आणि संबंधित करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- कर ऑडिट अहवाल सादर करण्यासाठी पुर्वीची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ होती. आता नवीन अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ ही आहे.
- २. आयकर रिटर्न दाखल करणे (ऑडिट केससाठी) पुर्वीची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ ही होती. आता नवीन अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५ ही आहे.
ITR भरण्याची मुदत का वाढवली?
उच्च न्यायालयांचे निर्देश: गुजरात, पंजाब आणि हरियाणा, तसेच हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयांनी वारंवार CBDT ला अंतिम मुदत वाढवण्याचे निर्देश दिले होते. ऑडिट अहवाल सादर करण्याची आणि ITR दाखल करण्याची अंतिम मुदत यामध्ये किमान एक महिन्याचे अंतर असावे, असे न्यायालयांनी स्पष्ट केले होते.
व्यवसायी संघटनांची मागणी: चार्टर्ड अकाउंटंट्स आणि विविध उद्योगांच्या संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
नैसर्गिक आपत्ती: देशाच्या काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक करदात्यांचे आणि चार्टर्ड अकाउंटंट्सचे काम विस्कळीत झाले होते. लेखापरीक्षण वेळेवर पूर्ण करणे शक्य नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.
ITR ऑनलाइन कसा भरावा? (How to File ITR Online - 4 Steps)
- आवश्यक कागदपत्रे गोळा करा: फॉर्म-१६ (Form 16), बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीचे पुरावे (Investment Proofs) आणि मागील वर्षाचा ITR यांसारखी आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- पोर्टलवर लॉगिन आणि डेटा तपासा: आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर (incometax.gov.in) पॅन (PAN) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. तुमचा ITR फॉर्म निवडा आणि फॉर्ममध्ये आधीच भरलेली (Pre-filled) तुमची सर्व माहिती (उदा. नाव, पत्ता, उत्पन्नाचे तपशील) व्यवस्थित तपासा आणि आवश्यक असल्यास दुरुस्त करा.
- उत्पन्न आणि कपातीचा तपशील भरा: पगार, घर मालमत्ता, व्यवसाय आणि इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील भरा. कलम ८० सी (Section 80C) आणि इतर कलमांखालील वजावटी (Deductions) व्यवस्थित क्लेम करा. तुमच्या कर दायित्वाची (Tax Liability) गणना करा.
- सबमिट आणि ई-व्हेरिफाय करा: अंतिम कर दायित्व (Outstanding Tax) असल्यास ऑनलाइन भरा. त्यानंतर तुमचा रिटर्न सबमिट करा आणि आधार OTP, नेट बँकिंग किंवा EVC वापरून रिटर्न ई-व्हेरिफाय (E-Verify) करा. ई-व्हेरिफाय केल्याशिवाय ITR प्रक्रिया पूर्ण मानली जात नाही.












Click it and Unblock the Notifications