ITR Filing: आयटीआर भरण्याची शेवटच तारीख कधी आहे; काय कागदपत्रे लागतात, रिटर्न्स कधी मिळेल? वाचा सर्व
ITR Filing When is the last date : येत्या एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे, अशातच आयटीआर अर्थात आयकर परतावा भरण्यासाठी करदाते तयार आहेत, लवकरच आयकर विभाग इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू करेल. जर तुम्ही करदाते असाल किंवा तुमचा टिडीएस कापला जात असेल तर आयकर वेळत भरल्यास तर तुम्हाला त्वरीत परतावा मिळेल.
मार्चअखेर आणि एप्रिल महिन्यात आयकर भरणे हे आपले महत्वाचे आर्थिक काम आहे. गेल्या आर्थिक वर्षांचा लेखाजोखा मांडणे हे खूपच महत्वाचे काम करदात्यांसाठी असते. प्राप्त माहितीनुसार, आयटीआर फॉर्म लवकरच जारी होण्याची अपेक्षा आहे.

'ही' आहे शेवटची तारीख?
आयकर भरण्याची तारखेबद्दल सांगायचे झाल्यास 31 जुलै ही तारीख आयकर भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर आयटीआर ITR दाखल केला तर तुमचे एक काम हलके होईल आणि विलंब टाळला जाईल, पर्यायाने तुमचा हक्काचा परतावाही तुम्हाला लवकर मिळू शकेल.
2024 मध्ये, एप्रिल महिन्यातच, आयकर विभागाने ऑनलाइन फॉर्म जारी केले होते. त्यामुळे यंदाही लवकरच ते जारी हतील, ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. जर आयटीआरमध्ये फरक नसल्यास, परतावा जारी केला जातो.
फार्म लवकर येईल अशी अपेक्षा
ज्या करदात्यांचा TDS कापला नाही ते देखील ITR दाखल करू शकतात, कारण फॉर्म 16 मे महिन्यात जारी केला जातो. आयकर तज्ज्ञांच्या मते आयकर विभागाकडून आयटीआर फॉर्म लवकरच येईल, अशी अपेक्षा आहे.
ITR फाईल करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?
मूल्यांकन वर्ष 2025- 26 आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर फायलिंगची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तुम्हाला तुमचे रिटर्न वेळेवर आणि कोणत्याही चुका न करता भरायचे असतील तर हे कागदपत्रे तयार ठेवा.
1.पॅन आणि आधार कार्ड
2. फॉर्म 16 (पगारदारांसाठी)
3. फॉर्म 26एएस आणि एआयएस
4. बँक खात्याचा तपशील
5. इंटरेस्ट सर्टिफिकेट
6. गुंतवणूकीचे पुरावे (कर कपातीसाठी)
7. गृहकर्ज आणि मालमत्तेची कागदपत्रे
8. भांडवली नफ्याचे विवरणपत्रे
9. परकीय उत्पन्न आणि मालमत्ता (लागू असल्यास)
10. फ्रीलांस किंवा व्यवसायाशी संबंधित उत्पन्न
11. आगाऊ कर आणि स्व-मूल्यांकन कराच्या पावत्या
हेही वाचा : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय-काय झाल्या घोषणा, अजित दादांनी काय केला वादा, वाचा-A टू Z बजेट!
हेही वाचा : अर्थसंकल्प 2025! लग्जरी ट्रेनचा प्रवास आता सामान्यांसाठी होणार स्वस्त; लवकरच येणार 350 लग्जरी ट्रेन
हेही वाचा : घरात उकरलं तरी सोनं अन् दारात उकरलं तरी सोनं..! असं ठिकाण जेथं आहे सोनेच सोने; वाचा रंजक माहिती
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications