अर्थसंकल्प 2025! लग्जरी ट्रेनचा प्रवास आता सामान्यांसाठी होणार स्वस्त; लवकरच येणार 350 लग्जरी ट्रेन
सर्वसामान्यांनाही लग्जरी ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष पावले उचलली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने सामान्य गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी सुसज्य गाड्या चालविण्याची ब्ल्यू प्रिंट सरकारला सादर केली. त्याला यंदाच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यामुळे आता सामान्यांनाही लग्जरी ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे.

काय म्हणाले आश्वीनी वैष्णव?
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या सर्वात आलिशान ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस आहे. त्यामुळेच या ट्रेनला देशात सर्वाधिक मागणी आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जनही लवकर सुरु होणार आहे. यामुळे लांबचा प्रवास करणारे लोकांना त्याचा फायदा होईल. या ट्रेनची संख्याही वाढवण्यात येत आहे.
लवकरच लग्झरी ट्रेन येणार
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर-चेअर कार, अमृत भारत आणि नमो भारत 350 ट्रेनची निर्मिती सुरु आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या ट्रेनची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या गाड्या मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या गाड्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अमृत भारतच्या 100 रेल्वे गाड्या, नमो भारतच्या 50 रेल्वे गाड्याआणि 200 वंदे भारत (स्लीपर आणि चेअरकार) यांचा समावेश आहे. या गाड्या दोन ते तीन वर्षांत तयार होतील.
अमृत भारतची चाचणी
वैष्णव पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी वंदे भारतसारख्या सुविधा असलेल्या अमृत भारत ही रेल्वे आहे. या रेल्वेची एक वर्षापासून चाचणी सुरु होती. आता ती पूर्ण झाली आहे. या श्रेणीतील दोन गाड्या गेल्या वर्षी धावल्या होत्या. आता अमृतभारत ट्रेनची संख्या वाढवली जात आहे. तसेच नमो भारत ट्रेनची दोन प्रमुख शहरां दरम्यानची चाचणी यशस्वी झाली आहे. ही ट्रेन गुजरातमधील गुज ते अहमदाबाद दरम्यान चालवली जात आहे. या ट्रेनची संख्याही वाढवली जाणार आहे आहे. या ट्रेनमुळे मोठ्या शहरांमधून जवळच्या शहरांमध्ये जाणे सोपे होणार आहे.












Click it and Unblock the Notifications