Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

10, 50, 100 अन् 500 रुपयांची नोट छापायला सरकारला किती खर्च येतो? आकडे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Indian Currency Printing Cost : आपण रोजच्या व्यवहारात १०, ५० किंवा ५०० रुपयांच्या नोटा अगदी सहज वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की ही कागदी नोट तुमच्या हातापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला स्वतःच्या खिशातून किती पैसे खर्च करावे लागतात? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) पैसे छापण्यासाठी सुद्धा पैसे खर्च करावे लागतात, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया, खिशात खुळखुळणाऱ्या या चलनी नोटांचा 'मेकिंग कॉस्ट' नक्की किती आहे!

Indian Currency Printing Cost

१० रुपयांच्या नोटेचा 'एवढा' छपाई खर्च!

'गुड रिटर्न्स'चे वृत्त आणि रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, १० रुपयांची एक नोट छापण्यासाठी सरकारला साधारणपणे ०.९६ रुपये (९६ पैसे) खर्च येतो. म्हणजेच १,००० नोटा छापण्यासाठी साधारण ९६० रुपये खर्च होतात. विशेष म्हणजे, २० रुपयांच्या नोटेचा खर्च १० रुपयांच्या नोटेपेक्षाही किंचित कमी आहे.

भारतीय चलनी नोटांच्या निर्मितीचा खर्च हा त्यांच्या मूल्यावर, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा वैशिष्ट्यांवर आणि कागदाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्हाला विविध नोटांच्या छपाईसाठी रिझर्व्ह बँकेला किती खर्च येतो, याचा अंदाज येईल.

भारतीय चलनी नोटांचा छपाई खर्च (प्रति नोट)

१० रुपयांची नोट: ही नोट तयार करण्यासाठी साधारण ९६ पैसे खर्च येतो. गमतीची गोष्ट म्हणजे, १० रुपयांच्या १००० नोटा छापण्यासाठी सरकारला ९६० रुपये खर्च करावे लागतात.

२० रुपयांची नोट: आश्चर्याची बाब म्हणजे १० रुपयांच्या नोटेपेक्षा २० रुपयांची नोट छापण्यासाठी कमी खर्च येतो. एका २० रुपयांच्या नोटेचा छपाई खर्च सुमारे ९५ पैसे इतका आहे.

५० रुपयांची नोट: ५० रुपयांची नोट छापण्यासाठी सरकारला प्रति नोट १.१३ रुपये खर्च येतो. १० आणि २० रुपयांच्या तुलनेत या नोटेचा आकार आणि सुरक्षा फिचर्स वेगळे असल्याने खर्च किंचित वाढतो.

१०० रुपयांची नोट: १०० रुपयांच्या एका नोटेची छपाई करण्यासाठी साधारण १.७७ रुपये खर्च येतो. यात वापरला जाणारा रंग आणि सुरक्षा धागा अधिक प्रगत असतो.

२०० रुपयांची नोट: २०० रुपयांची नोट छापण्यासाठी प्रति नोट २.३७ रुपये खर्च येतो. सध्या चलनात असलेल्या नोटांपैकी या नोटेचा छपाई खर्च सर्वात जास्त आहे.

५०० रुपयांची नोट: ५०० रुपयांची नवीन नोट छापण्यासाठी साधारण २.२९ रुपये खर्च येतो. ही नोट २०० रुपयांच्या नोटेपेक्षा आकाराने मोठी असली, तरी मोठ्या प्रमाणावर छपाई होत असल्यामुळे खर्च किंचित कमी होतो.

भारतात नोटांची छपाई कुठे आणि कोण करतं?

भारतीय चलनी नोटांची छपाई दोन महत्त्वाच्या संस्थांमार्फत केली जाते पहिली म्हणजे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) आणि भारतीया रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (BRBNMPL) या संस्थांमार्फत नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी या चार ठिकाणी केली जाते, ज्यात दोन सरकारी आणि दोन RBI च्या मालकीच्या प्रेसचा समावेश आहे.

नोटा छापताना केवळ कागद वापरला जात नाही, तर त्यात हाय-लेव्हल सिक्युरिटी फीचर्स, विशेष शाई आणि विशिष्ट प्रकारच्या कापसाच्या तंतूंचा वापर केला जातो, जेणेकरून बनावट नोटा तयार करणे कठीण होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+