आता एका क्लिकवर नवीन पॅन कार्ड! रिक्वेस्ट करा अन् ईमेलवर डिजिटल PAN मिळवा मोफत अर्ज कसा करायचा? वाचा
How to get new digital PAN card : पॅन कार्ड आधारकार्डएवढेच महत्वाचे कागदपत्र.. आजही देशातील काही लोकांनी पॅन कार्ड काढलेले नाही. हे पॅन कार्ड काढणे इतके सोपे असतानाही ते काढण्याकडे दुर्लक्ष होते. जर तुम्ही पॅन काढ वेळीच काढले नाहीतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. बँकेशी संबंधित काही महत्वाची कामं असतात जिथे तुमचे पॅनकार्डशिवाय पानही हलत नाही.
नवे पॅन कार्ड काढणाऱ्यांसाठी आणि ज्यांनी पॅन कार्ड काढलेच नाही अशा सर्वांसाठी एक मोठी बातमी आहे. भारत सरकारने पॅन कार्ड अधिक डिजिटल, स्मार्ट आणि सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक नवीन सुरुवात केली आहे. त्यामुळे नवे पॅन कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वाट पाहावी लागणार नाही तसेच त्यासाठी दीर्घ प्रक्रिया करण्याचीही गरज नाही.फक्त एका ऑनलाइन विनंतीने, कोणतेही पैसे न देता QR कोड असलेले नवीन ई-पॅन कार्ड थेट तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर पोहोचणार आहे.

पॅन 2.0 योजना म्हणजे काय?
पॅन 2.0 अंतर्गत, पॅन कार्डमध्ये आता एक नवीन डायनॅमिक क्यूआर कोड जोडला जाईल, जो वापरकर्त्याची नवीनतम माहिती रिअल टाइममध्ये पडताळण्यास सक्षम असेल. जुना क्यूआर कोड अपग्रेड करण्यात आला आहे, ज्यामुळे डेटाची अचूकता आणि सुरक्षितता दोन्ही वाढेल.
नवीन योजनेअंतर्गत ई-पॅन कार्ड मोफत उपलब्ध असेल, भौतिक कार्डसाठी शुल्क फक्त ₹ 50 असेल, कोणतेही कागदपत्रे लागणार नाहीत, सर्व काही ऑनलाइन असेल, डेटा सुरक्षित करण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट तयार केला जाईल. कॉल सेंटर आणि हेल्पडेस्क सुविधा देखील उपलब्ध असेल.
ईमेलवर डिजिटल पॅन कसा मिळवायचा?
- जर तुमचे पॅन कार्ड NSDL/प्रोटीन वरून बनवले असेल तर:
- वेबसाइट उघडा: https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
- पॅन क्रमांक, आधार आणि जन्मतारीख प्रविष्ट करा
- जनरेट करा आणि OTP प्रविष्ट करा
- पडताळणीनंतर, तुमचे ई-पॅन कार्ड तुमच्या मेलवर PDF स्वरूपात पाठवले जाईल
- जर तुमचे पॅन कार्ड अलीकडेच (30 दिवसांच्या आत) बनवले असेल, तर तुम्ही ही सेवा 3 वेळा मोफत घेऊ शकता. 30 दिवसांनंतर, ₹8.26 चे नाममात्र शुल्क भरून कार्ड ईमेलवर पुन्हा मिळू शकते.
जर तुमचे पॅन कार्ड UTIITSL द्वारे जारी केले असेल तर?
- वेबसाइट उघडा: https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard
- पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा प्रविष्ट करा
- जर नोंदणीकृत ईमेल आयडी लिंक केलेला असेल तर OTP येईल
- OTP प्रविष्ट केल्यानंतर, कार्ड थेट मेलवर येईल
- जर ईमेल आयडी लिंक केलेला नसेल तर ते प्रथम अपडेट करावे लागेल
जुने पॅन कार्ड वैधच
ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड आहेत, त्यांचे पॅन कार्ड पूर्णपणे वैध आहेत. परंतु जर तुम्हाला तुमची माहिती अपडेट ठेवायची असेल किंवा QR कोड असलेले स्मार्ट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही फक्त ₹ 50 मध्ये नवीन कार्ड ऑर्डर करू शकता.
..म्हणून पॅनकार्ड काढणे महत्वाचे
ज्यांचे वार्षिक उत्पन्न कराच्या कक्षेत येते. ज्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ₹ 5 लाखांपेक्षा जास्त आहे. जे बँक, शेअर्स, रिअल इस्टेटसारखे मोठे व्यवहार करतात त्यांना पॅनकार्ड काढणे आवश्यक आहे . व्यक्तीकडे फक्त एकच पॅन क्रमांक असावा. जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन क्रमांक आढळले तर ₹ हजारांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
नवीन पॅन कार्डची विशेषता?
स्मार्ट क्यूआर कोडद्वारे त्वरित पडताळणी, मोफत डिजिटल पॅन, फक्त ₹ 50 मध्ये भौतिक कार्ड, कागदविरहित प्रक्रिया, कोणतेही दस्तऐवज अपलोडिंग नाही, डेटा सुरक्षित, फसवणुकीपासून संरक्षण, एकाच पोर्टलवर उपलब्ध सर्व सेवा.
पॅन 2.0 योजना ही भारताची डिजिटल क्रांती अधिक वेगाने पुढे नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. जर तुम्हालाही या नवीन सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर आत्ताच तुमचा पॅन अपडेट करा आणि तुमच्या ईमेलवर मोफत ई-पॅन कार्ड मिळवा.












Click it and Unblock the Notifications