कसा तयार होतो देशाचा अर्थसंकल्प, कोण तयार करतात बजेट? जाणून घ्या सर्व गोष्टी
मुंबई - जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश असलेल्या भारताचे बजेटकडे जगाचे लक्ष लागते. भारतीय अर्थसंकल्प हा एक असा अर्थसंकल्प आहे, जिथे सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत, काही ना काही विशेष तरतुदी केल्या असतात. इथे फक्त लोकांसाठीच नाही तर विविध क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीवर सुद्धा तरतूद केली जाते. चला तर जाणून घेऊया अर्थसंकल्प कसा तयार होतो.
सामान्यांना मोठी आशा
यंदा तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर हा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सातव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. पंतप्रधानांची तिसऱ्या टर्ममुळे यंदाचा अर्थसंकल्प हा विशेष आहे.याअर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खूप आशा आहेत.

अर्थसंकल्प कोण तयार करते?
अर्थसंकल्प तयार करण्यासाठी केंद्रीय सरकराने वित्त मंत्रालय, तसेच नियोजन आयोग आणि खर्चाशी संबंधित मंत्रालयाची खास नेमणूक केली आहे. अनेक मंत्रालयांच्या विनंतीवरून अर्थ मंत्रालय खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात करते. या प्रक्रियेनंतर, अर्थ मंत्रालयामधील आर्थिक व्यवहार विभागाच्या अर्थसंकल्प विभागाद्वारे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम केले जाते.
असे तयार होते बजेट
सर्व केंद्रीय मंत्रालय, राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था, सरकारी विभाग, सशस्त्र दल यांना अर्थसंकल्प विभाग एक परिपत्रक जारी करतो. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी अंदाजे खर्च तयार करण्याचे निर्देश देतो. महसूल विभाग व आर्थिक व्यवहार विभाग, समाजातील शेतकरी, व्यापारी, अर्थतज्ञ, संघटना यांच्यासोबत चर्चा करते व त्यांना अर्थसंकल्पाबाबत आपले मत मांडण्यास सांगते. याला प्री-बजेट चर्चा असे सुद्धा म्हणतात. यानंतर अर्थमंत्र्यांच्या कामास सुरुवात होते. अर्थमंत्री कराचा अंतिम निर्णय घेतात व हे सर्व प्रस्ताव अंतिम होण्यापूर्वी एकदा पंतप्रधानांसोबत चर्चा करतात.
अखेरचा टप्पा काय असतो
अर्थमंत्री सर्व विभागांकडून खर्च तसेच उत्पनांची माहिती गोळा करतात. या डेटावरील आकडेवारीवरून पुढील वर्षासाठी अंदाजे उत्पन्न व खर्चच आरखडा तयार केला जातो. हे अर्थसंकल्प अंतिम करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा एक बैठक घेते, ज्यात बँकर्स, कृषी क्षेत्रातील लोकं, अर्थतज्ज्ञ आणि व्यापारी संघटनांचा समावेश केला जातो. अखेर अर्थ मंत्रालय या सर्व चर्चांच्या आधारे अर्थसंकल्पीय भाषण तयार करते.












Click it and Unblock the Notifications