Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Honda Activa E Scooter : होंडाचे 2 इलेक्ट्रिक स्कूटर Activa E आणि QC1 लाँच; जाणून घ्या-फिचर्स

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाच्या वतीने ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर देण्यात आली आहे. कंपनीने आज 27 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया, या लॉंच करण्यात आलेल्या दोन्ही स्कूटरविषयी.

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाच्या वतीने लॉंच करण्यात आलेली इलेक्ट्रिक टू-व्हीलर दोन रिप्लेसेबल बॅटरीसह येईल. होंडा Activa E आणि QC1 या दोन स्कूटर आहेत. यात दोन स्वॅप करण्यायोग्य बॅटरी आहेत. मात्र, त्यांच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही.

Honda Launches 2 Electric Scooters

या स्कूटीमध्ये काय सुविधा असणार?

कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेल्या प्रमाणे, या दोन्ही स्कूटरमध्ये कंपनीने Road Sync D.Yo ॲप प्रदान केले आहे, ज्याचा वापर OTA अपडेट, कॉल, सेवांसाठी केला जाऊ शकतो. Activa E मध्ये कंपनीने मोठी सीट, स्मार्ट की, यूएसबी सी आणि हुक, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, इनबिल्ट जीपीआरएस, डे अँड नाईट मोड, नेव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर्सची स्पर्धा Ola S1 शी असेल.

Activa E ला 102 KMची रेंज

Activa E मध्ये 6kW क्षमतेच्या दोन बॅटरी आहेत. यामुळे ते ताशी 80 किलोमीटर वेगाने धावू शकते. जी 102 किलोमीटरची रेंज देते. तर QC1 पूर्ण चार्ज झाल्यावर 80 किलोमीटरची रेंज मिळते.

गाडीच्या वैशिष्ट्याबद्दल घ्या जाणून..!

  • अॅक्टिव्हा इलेक्ट्रिकच्या खालच्या व्हेरियंटला 5-इंचाचा TFT डिस्प्ले मिळेल, तर टॉप व्हेरिएंटला 7-इंचाचा मल्टी-कलर स्क्रीन मिळेल.
  • बॅटरी चार्जर, लेफ्ट रेंज, स्पीड, मोड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सर्व्हिस अलर्ट आणि अनेक महत्त्वाची माहिती टच स्क्रीनमध्ये दिसेल. याशिवाय ई-स्कूटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स देखील असतील.
  • त्याच वेळी, स्पीडोमीटर, बॅटरी पर्सेंटेज, ओडोमीटर आणि प्रवास डेटा यासारखी माहिती ई-स्कूटरच्या बेस व्हेरिएंटच्या TFT डिस्प्लेमध्ये उपलब्ध असेल.
  • मागील टीझरनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विंगआर्म-माउंटेड मोटर असेल. याशिवाय एलईडी हेडलॅम्प आणि सीटची झलकही दिसली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप आणि यूएसबी-सी चार्जिंग पोर्टदेखील दिले जाईल.

किती रंगात आहे उपलब्ध

ई-स्कूटर CUVe चे संकल्पना मॉडेल नुकतेच मिलान, इटली येथे आयोजित ऑटोमोटिव्ह शो EICMA मध्ये सादर करण्यात आले. ई-ॲक्टिव्हाला पारंपारिक स्कूटर डिझाइन देण्यात आले आहे, जी अगदी साधी दिसते. यामध्ये फ्रंट पॅनलवर हेडलाइट देण्यात आला आहे.

तर ॲक्टिव्हा पेट्रोल व्हर्जनमध्ये हेडलाईट हँडल बारवर उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक स्कूटर तीन रंगांच्या पर्यायांसह सादर केली जाईल. यामध्ये पर्ल ज्युबिली व्हाइट, मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक आणि प्रीमियम सिल्व्हर मेटॅलिक यांचा समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+