Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जर 30, 40 किंवा 50 हजार पगार असेल तर 1 वर्षाची ग्रॅच्युइटी किती मिळेल! वाचा नवीन कायद्यानुसार गणित

Gratuity calculation for 1 year new labour code fixed term employee : देशात ४ नवीन श्रम कायदे २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. या बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 'फिक्स्ड-टर्म एम्प्लॉईज' (Fixed-Term Employees - FTE) साठी ग्रॅच्युइटी पात्रतेचा नियम. आतापर्यंत ५ वर्षांची सतत सेवा आवश्यक असताना, नवीन नियमांनुसार फक्त १ वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटी मिळणार आहे. तुमचा पगार ४०,००० रुपये असल्यास, तुम्हाला १ वर्षासाठी किती ग्रॅच्युइटी मिळेल, हे स्टेप-बाय-स्टेप पाहूया.

यासह तुमचे पगार जर ३० आण ५० हजार असेल तर किती ग्रॅच्युईटी रक्कम मिळेल हे सुत्रानुसार आपण जाणून घेऊया. ज्यामुळे जर तुम्ही फिक्स टर्म कर्मचारी असाल तर तुम्हाला नोकरी बदलताना याचा अचूक अंदाज येणे गरजेचे आहे.

Gratuity calculation for 1 year new labour code

नवीन लेबर कोड आणि ग्रॅच्युइटीतील बदल

नवीन श्रम कायद्यांमुळे कामगार आणि कंपन्या या दोघांनाही बळकटी मिळणार आहे. हे चार नवीन कायदे जुन्या २९ कायद्यांची जागा घेणार आहेत.

चार नवीन कायदे

  • वेतन संहिता, २०१९ (Code on Wages, 2019)
  • औद्योगिक संबंध संहिता, २०२० (Industrial Relations Code, 2020)
  • सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (Social Security Code, 2020)
  • व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थिती संहिता, २०२० (Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020)

नवीन नियमांतील महत्त्वाचा बदल

  • 'फिक्स्ड-टर्म कर्मचारी' (FTE) म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी किंवा प्रकल्पासाठी नियुक्त केलेले कर्मचारी. या कर्मचाऱ्यांसाठी, सरकारने ग्रॅच्युइटी पात्रतेसाठी लागणाऱ्या किमान सलग सेवेची अट पाच वर्षांवरून घटवून केवळ एक वर्ष केली आहे.
  • फिक्स्ड-टर्म कर्मचाऱ्याला आता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांइतकेच सर्व फायदे (उदा. सुट्टी, वैद्यकीय, सामाजिक सुरक्षा) मिळतील.

ग्रॅच्युइटी गणनेचे सूत्र (नवीन नियमानुसार FTE साठी)

ग्रॅच्युइटीची गणना 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट' नुसार केली जाते. हे सूत्र सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी किंवा सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी, शेवटच्या पगाराच्या १५ दिवसांवर आधारित आहे.

ग्रॅच्युइटी गणनेचे सूत्र:

  • ग्रॅच्युइटी=२६१५×शेवटचापगार×सेवेचाकालावधी(वर्षांमध्ये)​
  • येथे, १५ हे पंधरा दिवसांचे वेतन दर्शवते, तर २६ हे महिन्यातील कामाच्या दिवसांची संख्या (सरासरी) दर्शवते.
  • उदाहरण: १ वर्षाच्या सेवेसाठी ग्रॅच्युइटी गणना (पगार ₹४०,०००)
  • नवीन लेबर कोडनुसार, फिक्स्ड-टर्म कर्मचाऱ्यासाठी १ वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते हे बघुया.

सोप्या भाषेत गणित समजून घेऊया

जर तुमचा शेवटचा पगार (मासिक) ₹४०,००० असेल आणि सेवेचा कालावधी (किमान) १ वर्ष असेल तर १५ गुणीले शेवटचा पगार गुणीले सेवेचा कालावधी (वर्षांमध्ये) भागिले २६ असे हे सूत्र आहे. यानुसार, उदाहरण समजून घेऊया.

(१५×४०,०००×१)
______________ = (ग्रॅच्युइटी रक्कम ₹२३,०७६.९२) इतकी..

२६

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+