Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today: सोने-चांदीच्या किंमतींमध्ये दररोज चढ-उतार होत राहतात. मात्र आज म्हणजेच गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आता प्रति 10 ग्रॅम 80 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे, तर चांदीचा भाव 98 हजार रुपयांच्या खाली आला आहे.

भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

भारतीय सराफा बाजारानुसार आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 400 रुपयांची किंचित घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 380 रुपयांची घट झाली आहे. यासह देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत आता 87 हजार रुपायाच्यावर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 80,400 रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी चांदीची किंमत 95769 रुपयांवर आली.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,810 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 80,480 आहे.

ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,810 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम80,480 आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,810 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम80,480 आहे.

नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,810 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम80,480 आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,813 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम80,483 आहे.

जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,810 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम80,480 आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87,810 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम80,480 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+