सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं?
Gold silver rate today 20 march 2026 : जागतिक बाजारात युद्धजन्य परिस्थिती असतानाही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत सोन्याचे भाव तब्बल ७,००० रुपयांनी कोसळले असून, सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५०,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर
१. मुंबई, पुणे आणि नागपूर (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर आज एकाच पातळीवर स्थिर आहेत.
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): प्रति १० ग्रॅमसाठी १,५०,२७० रुपये मोजावे लागतील. कालच्या तुलनेत यात मोठी घसरण झाली आहे.
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सोन्याचा भाव १,३७,७४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
- १८ कॅरेट (कमी शुद्धता): १८ कॅरेट सोन्याचा दर १,१८,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
२. दिल्ली (राजधानी)
देशाच्या राजधानीत सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत किंचित जास्त आहेत.
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): दिल्लीत १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव १,५०,४२० रुपये आहे. मुंबईच्या तुलनेत दिल्लीत सोने १५० रुपयांनी महाग आहे.
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): येथे २२ कॅरेट सोन्यासाठी १,३७,८९० रुपये प्रति १० ग्रॅम असा दर निश्चित करण्यात आला आहे.
- १८ कॅरेट (कमी शुद्धता): १८ कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत १,१८,२१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
युद्ध सुरू असताना सोनं स्वस्त का होत आहे?
सहसा युद्धाच्या काळात सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी उलट कल दिसत आहे. याची प्रमुख कारणे आहेत.
१. नफावसुली (Profit Booking): जानेवारीत सोन्याने १.७६ लाख रुपयांचा उच्चांक गाठला होता. आता मोठे गुंतवणूकदार सोने विकून नफा पदरात पाडून घेत आहेत.
२. रोख रकमेची गरज: अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी सोन्याची विक्री करून रोख रक्कम (Cash) जमा करण्यावर भर देत आहेत.
३. व्याजदर आणि कच्चे तेल: अमेरिकेतील व्याजदरांबाबतचे कडक धोरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम सोन्याच्या चमक फिकी करण्यावर झाला आहे.
चांदीच्या दरातही मोठी घट
केवळ सोनंच नाही, तर चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ३.८६ लाख रुपयांवर असलेली चांदी आता २.३० लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. सोन्याच्या दरातही उच्चांकावरून आतापर्यंत सुमारे २८,००० रुपयांची घट झाली आहे.
(टीप: सोन्याचे हे दर 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) द्वारे जारी केले जातात. स्थानिक कर आणि जीएसटीमुळे दागिन्यांच्या किमतीत बदल होऊ शकतो.)












Click it and Unblock the Notifications