Gold prices : 8 वर्षात 67 हजारांनी वाढले सोन्याचे भाव मुंबई, पुण्यात आज गोल्ड रेट काय जाणून घ्या?
Gold prices have increased by 67 thousand in 8 years : सोन्याचे दर गेल्या दोन वर्षात कमालीचे वाढले असून यंदा तर सोन्याने दराच्या बाबतीत लाखाचा आकडा पार केला आहे. या वर्षी सोन्याला चांगली तेजी आली आहे, त्यामुळे सोन्याचे दर घसरतील अशी शक्यता कमी झाली आहे. मुळातः जुलै २०१७ मध्ये सोन्याचे भाव ३२ हजार रुपयांपर्यंत होते, हेच भाव आता ८ वर्षात ९९ हजार रुपये प्रतितोळ्याच्या घरात पोहचले आहेत. गेल्या आठ वर्षात तब्बल ६७ हजारांनी सोन्याचे भाव वाढले आहेत.
सोने हे गुंतवणुकीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. कारण आतापर्यंत सोन्याने परतावाच दिला आहे. सोने खरेदी करुन कुणाचेही नुकसान झाले असे झालेले नाही. सोन्याची झळाळी कायमच चकाकते आणि गंगाजळी वाढवते. त्यामुळेच गुंतवणुकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

सोने हे सर्वकालीन गुंतवणुकीचे मोठे साधन आहे. म्हणूनच सोने खरेदी किंवा विक्रीपुर्वी सोन्याचे ताजे भाव समजून घेणे आवश्यक आहे. आज सोन्याच्या किमतीत थोडी वाढ दिसून येत आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक आणि नागपूरमधील सोन्या-चांदीच्या नवीनतम किमतींचा आढावा घेऊया.
पुण्यात आज सोन्याचा भाव काय?
पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव ₹ ९,९८८, तर २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५५ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर ७,४९१ प्रतिग्रॅम इतके आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव काय?
मुंबईत आज सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,९८८, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५५ आणि १८ कॅरेट सोन्यासाठी ७,४९१ प्रति ग्रॅम आहे.
नागपुरात आज सोन्याचा भाव काय?
आज नागपुरात सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,९८८, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५५ आणि १८ कॅरेट सोन्यासाठी ७,४९१ प्रति ग्रॅम आहे.
नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव काय?
आज नाशिकमध्ये सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,९९३, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५८ आणि १८ कॅरेट सोन्यासाठी (ज्याला ९९९ सोने देखील म्हणतात) ७,४९४ प्रति ग्रॅम आहे.
जळगावात आज सोन्याचा भाव काय?
आज जळगावमध्ये सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,९८८, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५५ आणि १८ कॅरेट सोन्यासाठी (ज्याला ९९९ सोने देखील म्हणतात) प्रति ग्रॅम ₹७,४९१ आहे.
Disclaimer : आर्थिक स्थिरता आणि वाढीसाठी तुमचे पैसे सुज्ञपणे गुंतवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोन्याचे भाव सतत बदलत आहेत, त्यामुळे आम्ही दिलेले सोन्याचे दर कधीही बदलू शकतात, तुम्ही खरेदीपुर्वी ताजे अपडेट्स घेऊ शकता.












Click it and Unblock the Notifications