Gold price Today : आज सोन्याचे भाव किती, जाणून घ्या मुंबई, पुण्यासह या शहरातील ताजे दर
Gold price Today : गेल्या काही वर्षांत सोने महागाईच्या विरोधात एक उत्तम गुंतवणूक म्हणून पुढे आले आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे एक महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. आज भारतात २२ जुलैला सोन्याचे दर आज वाढलेले दिसून येत आहेत.
गुड रिटर्न्सनुसार, आज भारतात २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,१२९ रुपये तर २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,२८५ रुपये दर आहे, आज दुपारी एक ते दीडदरम्यानचे हे भाव आहेत. सोन्याचे दर सतत बदलत आहेत, त्यामुळे सोने खरेदी करताना दर पाहुनच खरेदी करावी असा सल्ला मार्केट तज्ज्ञ देत आहेत.

चांदीची किंमत काय?
देशात आज चांदीच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली असून कालही भाव घसरले होते. बुलीयन डाॅट को इननुसार, आज चांदीचा दर प्रति किलो १ लाख १४ हजार ८५० रुपये इतका आहे. हे आज २२ जुलै २०२५ दुपारी एक ते दीडदरम्यानचे भाव आहेत. आज चांदीचे दर १८० रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत.
भारतात आज सोन्याची किंमत काय
- २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,१२९ रुपये
- २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,२८५ रुपये
- १८ कॅरेट सोन्यासाठी ७,५९७ प्रति ग्रॅम रुपये
आज महाराष्ट्रातील या तीन शहरातील सोन्याचे भाव किती?
नागपूरमध्ये आज सोन्याची किंमत
नागपूर हे सोन्याच्या खरेदीसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे. नागपुरात तुम्हाला सर्वोत्तम सोन्याचे दर देणारी अनेक स्थानिक दुकाने आहेत. सोने खरेदी करण्यापूर्वी नागपुरातील सोन्याचे थेट दर नेहमी तपासा.
- २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,१२९ रुपये
- २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,२८५ रुपये
- १८ कॅरेट सोन्यासाठी ७,५९७ रुपये प्रति ग्रॅम
पुण्यात आज सोन्याचा भाव
- २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,१२९ रुपये
- २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,२८५ रुपये
- १८ कॅरेट सोन्यासाठी ७,५९७ प्रति ग्रॅम रुपये.
मुंबईत आज सोन्याचा भाव
- २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,१२९ रुपये
- २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,२८५ रुपये
- १८ कॅरेट सोन्यासाठी ७,५९७ रुपये प्रति ग्रॅम आहे.
यंदा सोन्याचे दर घसरणीची शक्यता कमीच..
या वर्षी सोन्याने चांगली तेजी दाखवली आहे, त्यामुळे घसरणीची शक्यता कमी झाली आहे. खरं तर, जुलै २०१७ मध्ये सोन्याच्या किमती ३२ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. हेच आज दर लाखांच्या घरात आहेत, म्हणजेच आठ वर्षात सुमारे ६८ हजार रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत.
सोन्याच्या दरातील चढ-उतार आणि खरेदीसाठी सल्ला
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, रुपया-डॉलर विनिमय दर, तसेच सण-उत्सवाच्या काळात वाढणारी मागणी यासारख्या विविध घटकांमुळे सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असतो. सध्या सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी. सोन्यात गुंतवणूक करताना किंवा दागिने खरेदी करताना दरांचे योग्य विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. बाजारातील तज्ज्ञ नेहमी सोन्याचे दर पाहूनच खरेदी करण्याचा सल्ला देतात.












Click it and Unblock the Notifications