Gold Price Today : दिवाळी संपताच सोन्याच्या भावात घट,जाणून घ्या तुमच्या शहारातील आजचे ताजे भाव
Gold Price Today : दिवाळी आणि धनत्रयोदशी संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. सोमवार 04 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात सुमारे 400 रुपयांची घसरण झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून देशभरात सोने-चांदीचे भाव उच्चांक गाठला आहे.
सोने ही नेहमीच गुंतवणूकदरांची पहिली पसंती राहिली आहे. त्यामुळे पुढील काळात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 80 हजार रुपयांच्या पुढे आहे.

दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार 500 रुपयांच्या पुढे आहे. आज सोमवार 4 नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदी 96 हजार 900 रुपये प्रतिकिलो आहे. चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहारतील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,040 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,040 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,040 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,040 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,373 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,043 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,370 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,370 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications