Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात सोन्याचा दर काय आहे?
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढले आहेत. चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.सोने हे नेहमीच गंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात ही सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. मात्र जाणकारांच्या मते लग्नाच्या काळात सोने स्वस्त होणार नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे.

आज चांदीच्या दरात 2000 रुपयांचा फरक दिसून आला आहे. एक किलो चांदीची किंमत आता 91,500 रुपये झाली आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,153 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,803 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications