Gold Price Today : आज पुन्हा सोनं महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे भाव?
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज गुरुवार 28 नोव्हेंबर रोजीही सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. 27 नोव्हेंबरच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे.
लग्नसराईत सोने स्वस्त होण्याची आशा नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे.

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एक किलो चांदीची किंमत फक्त 89,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,093 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,093 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,738 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,090 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications