Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold price today : दागिने खरेदी करताय! थोडं थांबा, आधीच जाणून घ्या आज सोने स्वस्त की महाग?

Gold price today : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (25 नोव्हेंबर) सराफा बाजार उघडला असून आता सोन्याचे ताजे भाव येण्यास सुरुवात झाली आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यानंतर आज सुमारे एक हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत दिल्लीपेक्षा सोन्याचे भाव स्वस्त

लग्नसराईत सोने स्वस्त होण्याची आशा नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 79 हजार रुपयांच्या पुढे आहे. ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 73 हजार रुपयांच्या पुढे आहे.

Gold price today

आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी एक लाख रुपये किलो आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

हेही वाचा : Gold rate price today : आज निकालाच्या दिवशी सोन्याचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या आजचे नवीन दर

25 नोव्हेंबर 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

दिल्ली सोन्याचा दर: आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 790 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई सोन्याचा दर: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता सोन्याचा दर: कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई सोन्याची किंमत: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद सोन्याचा दर: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ सोन्याचा दर: लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर सोने दर : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा सोन्याचा दर : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद गोल्ड रेट : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम सोन्याचा दर: गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू आज सोन्याचे दर: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडा सोन्याचे भाव : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+