Gold Price Today : आठवडाभरात 3 हजाराने स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचे ताजे भाव
Gold Price Today : मागील आठवड्यापासून देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज रविवारी 17 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात सोने 3 हजार 710 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
चांदीच्या दरातही घसरण सुरूच आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या भाव 69 हजार रुपये आहे. गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो 89,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,565 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,565 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,565 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,565 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,938 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,568 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,565 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,565 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications