Gold Price Today : आज सोन्याच्या भावात वाढ, जाणून घ्या 22, 24 कॅरेट सोन्याचा भाव?
Gold Price Today : मागील काही आठवड्यापासून सोन्याच्या भावात सतत घसरण होतं आहे. मात्र आज शनिवार 16 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत आज सोने 100 रुपयांनी महागलं आहे.
आज चांदी स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 69 हजार रुपयांच्या पुढे आहे.
चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे. आज शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी चांदी 89,400 रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
देशातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे भाव
दिल्ली : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 920 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 69,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकत्ता : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबादः हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications