सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी! 2 दिवसांत 12,500 रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे 22 अन् 24 कॅरेटचे नवे दर
Gold Price Today ₹12500 Drop in 2 Days : तुम्ही जर दसरा, दिवाळी किंवा लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी सोनेरी संधी घेऊन आली आहे! आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात बंपर घसरण झाली आहे. किंमत प्रति १०० ग्रॅममागे तब्बल ₹१२,५००/- नी खाली आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या हंगामात गुंतवणूक किंवा दागिने खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे.

आजचे नेमके दर किती आहेत?
२४ कॅरेट आणि २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा सध्याचा भाव जाणून आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या उलथापालथीमुळे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल ₹१२,५००/- पर्यंतची कपात झाली आहे.
सोन्याच्या भावातील घसरणीमागे काय आहे कारण?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रावरील १०० टक्के टॅरिफ (दर) जाहीर केल्यानंतर आणि अमेरिकेचे आर्थिक आकडे अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत आल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे भाव नरमले. या घसरणीला सध्याच्या सणासुदीच्या हंगामात खरेदीची चांगली संधी म्हणून पाहिले जात आहे.
MCX वर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार
- शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२५) मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याचे दर घसरणीसह उघडले.
- डिसेंबर वायदा सोने: ₹१,१३,७९५/- प्रति १० ग्रॅम (०.०६% घसरण).
- चांदी: ₹१,३६,८७६/- प्रति किलो (०.१३% घसरण).
- सद्यस्थिती: सकाळी ९:५१ वाजता MCX वर ५ डिसेंबर कराराचे सोन्याचे भाव ₹१,१३,९७०/- प्रति १० ग्रॅमवर (₹९९/- च्या वाढीसह) व्यवहार करत होते, तर चांदीचा भाव ₹१,३६,९६७/- प्रति किलोग्रामवर होता.
भारतात सोन्याचे नवे दर आज (२६ सप्टेंबर २०२५)
लगातार दोन दिवसांच्या घसरणीनंतर, भारतात २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१२,५००/- नी तर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१,२५०/- नी कमी झाली आहे.
सोन्याचे कॅरेटनिहाय भाव
- २४ कॅरेट (शुद्ध सोने) १०० ग्रॅम ₹११,४४,४००/-
- २४ कॅरेट (शुद्ध सोने) १० ग्रॅम ₹१,१४,४४०/-
- २२ कॅरेट (दागिने) १०० ग्रॅम ₹१०,४९,०००/-
- २२ कॅरेट (दागिने) १० ग्रॅम ₹१,०४,९००/-
- १८ कॅरेट १० ग्रॅम ₹८५,८३०/-
चांदीने गाठला नवा शिखर
१ किलो चांदीचा दर: ₹१,४३,०००/- (नवीन उच्चांक)
१०० ग्रॅम चांदीचा दर: ₹१४,३००/-
१० ग्रॅम चांदीचा दर: ₹१,४३०/-
सोन्या-चांदीच्या दरांचे तज्ज्ञांचे अंदाज
गुड रिटर्न्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी) राहुल कलंत्री यांच्या मते, सकारात्मक अमेरिकन आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications