Gold Price : सोने-चांदी खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या लग्नसराईचा सीझन असल्याने सोने आणि चांदीची मागणीही जास्त आहे. आज मंगळवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ झाली आहे.
चांदीच्या किमतीत काहीशी घट झाली आहे. लग्न कार्य असो किंवा इतर कोणताही खास प्रसंग, सोने ही नेहमीच भारतीय कुटुंबांची पहिली पसंती राहिली आहे.
देशभरात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी वाढून 87,390 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त होऊन 99,400 रुपये प्रति किलो झाली. तर मग या लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे ताजे भाव काय आहेत ते जाणून घ्या.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे भाव
मुंबई : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87,390 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,110 रुपये आहे.
दिल्ली : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87,540 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 80,260 रुपये आहे.
कोलकाता : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,390 रुपये आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 80,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,390 रुपये आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,160 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,440 रुपये आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 80,260 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,540 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications