Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : आठवडाभरात सोने 1000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात सोने-चांदी भाव

Gold Price Today : सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. आज रविवारी 10 नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव जवळपास स्थिर आहेत. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात होणारी घसरण लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणा-यासाठी एक चांगली संधी आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 79 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत सुमारे 72 हजार रुपयांच्या पुढे आहे. चांदीच्या दरातही घसरण होत आहे.

Gold Price Today

गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात तीन हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. चांदीचा भाव सध्या 94 हजार रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,936 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,278 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,939 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+